घरताज्या घडामोडी३०० युनिटपर्यंतचे वीजबिल मोफत देणार, गुजरातच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच काँग्रेसची मोठी घोषणा

३०० युनिटपर्यंतचे वीजबिल मोफत देणार, गुजरातच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच काँग्रेसची मोठी घोषणा

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काँग्रेसने येथील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

राज्यातील १८२ मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. तसेच अंतिम निकाल ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गेंचं ट्वीट काय?

गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत आणि १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही देण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीत कॉन्ट्रॅक्ट स्टिस्टम बंद करण्यात येणार आणि को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दूधावर ५ रुपये लीटर सब्सिडी देण्यात येणार असल्याचं आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं आहे.

- Advertisement -

गुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. भाजप कोअर कमिटी आणि राज्य निवडणूक समितीच्या नेत्यांची राज्यातील पक्षाच्या मुख्यालयात बैठका सुरू आहेत. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत पाहायला मिळते. मात्र, यंदा केजरीवालांच्या आपचीही एन्ट्री होणार आहे.


हेही वाचा : शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात ; सरकार दिलासा देण्यात अपयशी, जयंत पाटलांची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -