Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी काँग्रेस भाजपमध्ये नेहरुंवरुन सोशल मीडियामध्ये जुंपली, 'असे' फोटो केले शेअर

काँग्रेस भाजपमध्ये नेहरुंवरुन सोशल मीडियामध्ये जुंपली, ‘असे’ फोटो केले शेअर

Subscribe

दिल्लीतील नवे संसद भवनावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संसद भवनाच्या उद्धाटनाच्या वादानंतर आत फोटोवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन झाल्यानंतर विरोधकांकडून मोदींची प्रतिमा उंचावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली जात आहे.

दिल्लीतील नवे संसद भवनावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संसद भवनाच्या उद्धाटनाच्या वादानंतर आत फोटोवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन झाल्यानंतर विरोधकांकडून मोदींची प्रतिमा उंचावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्वीट केलं. यात ‘कितनी बी कोशिश कर लो’, असं लिहून त्यासोबत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. (Congress Bjp Tweets photo Jawaharlal Nehru And Narendra Modi Photo)

काँग्रेसनं ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो आहे. नेहरु उभे असून समोर पाहात असल्याचे या फोटोत दिसत आहे. त्यांच्या बाजूलाच अत्यंत लहान आकृतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जवाहरलाल नेहरुंची उंची कधीही गाठता येणार नाही, अशा आशयाचा संदेश काँग्रेसला द्यायचा असल्याचं म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या ट्वीटला भाजपान जवाहरलाल नेहरूंचा तोच फोटो घेऊन खोचक टोला लगावला आहे. “नेहरू का सच” असं ट्वीट करत भारतीय जनता पक्षानं नेहरूंचा तोच फोटो घेतला आहे. त्यामध्ये ‘Reel’ आणि ‘Real’ असं लिहिण्यात आलं आहे. एकीकडे जवाहरलाल नेहरूंचा मोठ्या आकारातला फोटो असून दुसऱ्या बाजूच्या कॅमेऱ्याखाली नेहरूंचा छोट्या आकारातला फोटो दिसत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन झालं. विधिवत ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात भारताचा विकास आणि अमृतकाल यासंदर्भात गौरवपूर्ण उल्लेख केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर आता त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


हेही वाचा – ‘अहंकारी राजा’; कुस्तीपटूंवर झालेल्या कारवाईनंतर राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -