घरताज्या घडामोडीसोनिया गांधी यांना ईडीची नोटीस, २१ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस, २१ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Subscribe

राहूल गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीने नोटीस बजावली असून २१ जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी राहूल गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. (Congress chairman Sonia Gandhi has been asked to appear before ed on july 21 national herald in money laundering case)

हेही वाचा  देशातील सर्व राजभवनांना उद्या घेराव घालणार, काँग्रेस नेते आक्रमक

- Advertisement -

सोनिया गांधी यांना याआधीच नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, त्यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत. तसेच, त्यांना पोस्ट कोविडचाही त्रास झाल्याने त्यांनी ४ आठवड्यांची मुदत मागितली होती. ही मुदत २२ तारखेला संपणार असल्याने ईडीने २१ जुलैचीच नोटीस दिली आहे.

हेही वाचा – काँग्रेसकडून मुंबईत जोरदार आंदोलन; पोलीस बंदोबस्तात मोर्चा राजभवनकडे रवाना

- Advertisement -

१४,१५,१६ जून रोजी राहूल गांधी यांची सतत तीन दिवस ईडीने चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. राहूल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी झाल्याने देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते. मुंबईतही आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. एका खासदाराला अशाप्रकारे त्रास देणं योग्य नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय?

‘नॅशनल हेराल्ड‘ हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र २०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं. मात्र हे वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.

त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयानं राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त ५० लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -