पी चिदंबरम यांना पोलिसांच्या धक्काबुक्कीत गंभीर दुखापत, हाड मोडल्याचा काँग्रेसचा दावा

धक्काबुक्कीमध्ये पी चिदंबरम यांचा चष्मा खाली फेकण्यात आला. त्यांच्या डाव्या बाजूला बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. खासदार प्रमोद तिवारी यांना रस्त्यावर फेकण्यात आले त्यांना गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाले आहेत. हीच लोकशाही आहे का? विरोध करणं अपराध आहे का? असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी केला

P Chidambaram suffered serious injuries
पी चिदंबरम यांना पोलिसांच्या धक्काबुक्कीत गंभीर दुखापत, हाड मोडल्याचा काँग्रेसचा दावा

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. चौकशीदरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे मुख्य कार्यालय ते ईडी कार्यालय असे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी असंख्या कार्यकर्ते रसत्यावर उतरले होते. काँग्रेसचे काही बडे नेतेसुद्धा मोर्चामध्ये सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांना या धक्काबुक्कीमध्ये गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हाड मोडल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत चिदंबरम जखमी झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांना गंभीर दुखापत झाली आहे. धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या डाव्या बरगडीला फ्रॅक्चर झाला आहे. पी चिदंबरम यांनी ट्विट करत माहिती दिली की, जेव्हा तीन मोठे आणि कठोर पोलिस तुमच्याशी टक्कर घेतात, तेव्हा तुम्ही भाग्यवान असाल तर मोठ्या दुखापतीपासून वाचता! डॉक्टरांनी सांगितले आहे की हेयरलाईन फ्रॅक्चर झाला असून १० दिवसात बरे होईल. माझी प्रकृती ठीक असून मी उद्या कामावर रुजू होईल असे चिदंबरम यांनी ट्विट करत सांगितले आहे.

धक्काबुक्कीत चिदंबरम यांचा चष्मा फेकला

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये पी चिदंबरम यांचा चष्मा खाली फेकण्यात आला. त्यांच्या डाव्या बाजूला बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. खासदार प्रमोद तिवारी यांना रस्त्यावर फेकण्यात आले त्यांना गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाले आहेत. हीच लोकशाही आहे का? विरोध करणं अपराध आहे का? असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

राहुल गांधींची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीने पुन्हा ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांच्यासमोर अनेक पुरावे आणि कागदपत्रे ठेवण्यात येतील ज्यावर त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. राहुल गांधींचा जवाब पीएमएलए अॅक्ट सेक्शन ५० अंतर्गत नोंदवण्यात आणि रेकॉर्ड करण्यात येत आहे.


हेही वाचा : राहुल गांधींनी ईडी चौकशीदरम्यान बदलली अनेक प्रश्नांची उत्तरं, आज पुन्हा चौकशीला राहणार हजर