काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलर आणि स्टॅलिनशी तुलना, ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ आहे कारण

नवी दिल्ली : ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’च्या नावावरून काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना जयराम रमेश यांनी ट्विटरवर त्यांच्या काळातील हुकूमशहांची यादी शेअर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव शेवटी लिहिण्यात आले आहे.

जयराम रमेश यांनी ट्विटरवर 8 नावांचा उल्लेख करताना लिहिले की, “पंतप्रधानांनी त्यांच्या नावावर असलेल्या स्टेडियममध्ये त्यांच्या छायाचित्रासह स्वत: चा सन्मान केल्याने आम्हाला अशा नेत्यांची आठवण होते ज्यांनी त्यांच्या हयातीत स्टेडियमचे नाव ठेवले.” यानंतर त्यांनी 8 नावे लिहिली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचेही नाव शेवटी आहे.

या यादीत जोसेफ स्टॅलिन यांचे नाव पहिले आहे. त्यानंतर हिटलर, बेनिटो मुसोलिनी, किम इल सुंग, मुअम्मर गद्दाफी, सद्दाम हुसेन, रेसेप तय्यप एर्दोगन आणि नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले आहे. जयराम रमेश यांनी एका बाजूने पंतप्रधान मोदींची या सर्व नेत्यांशी तुलना केली आहे.

भाजप नेत्याचे प्रत्युत्तर
जयराम रमेश यांच्या या ट्विटला भाजप नेते तेजिंदर सिंह सरन यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवर लिहिले की, नेहरू घराण्याचे पंतप्रधान आम्हाला त्यांच्या हयातीत स्टेडियम/पुरस्कार मिळालेल्या इतर नेत्यांच्या यादीची आठवण करून देतात. पुढे त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासह 9 नावे लिहिली आहेत. या यादीत स्टालिन यांचे नाव पहिले आहे. त्यानंतर हिटलर, मुसोलिनी, किम इल, मुअम्मर गद्दाफी, सद्दाम हुसैन, रिसेप एर्दोगन, जवाहरलाल नेहरू, इंद्रिरा गांधी आणि शेवटी राजीव गांधी यांचे नाव आहे. तेजिंदर सिंह सरन यांनी सुद्धा काँग्रेस नेत्यांची या सर्व नेत्यांशी तुलना केली आहे.

मोदी आणि अल्बानीज यांची नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अर्धा तास पाहिला. नरेंद्र मोदी स्टेडियममधील ‘हॉल ऑफ फेम म्युझियम’चे उद्घाटन दोन्ही पंतप्रधानांनी केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी आपापल्या पंतप्रधानांसोबत मैदानावर जाऊन त्यांची इतर खेळाडूंशी ओळख करून दिली.

स्टेडियमच्या नावावरून गदारोळ का?
खरे तर 2020 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन केले होते. पूर्वी या स्टेडियमचे नाव मोटेरा स्टेडियम असे होते, परंतु 2021 मध्ये त्याचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे करण्यात आले. यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीतही आश्वासन दिले होते की, आपले सरकार स्थापन झाल्यास नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलून सरदार पटेल स्टेडियम करू.