Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशCongress on Rohit Sharma : आधी तुमचा कर्णधार बघा, रोहित शर्माला डिवचणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपचे प्रत्युत्तर

Congress on Rohit Sharma : आधी तुमचा कर्णधार बघा, रोहित शर्माला डिवचणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपचे प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. असे असताना आपल्याच देशात रोहित शर्मा हा राजकीय टीका टिपण्णीचा बळी ठरला आहे. नुकतेच काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद म्हणाल्या की, “रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून खूप लठ्ठ आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज असून तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे.” अशी टीका केली. त्यांनी केलेल्या या टीकेवर आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच, यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरदेखील टीका करण्यात आली आहे. (Congress criticized Rohit Sharma and BJP attacked congress leader)

हेही वाचा : Nana Patole : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आमचेच, काँग्रेसचा दावा 

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी केलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकाच वादळ उठले. त्यानंतर, ‘आमचा पक्ष क्रीडा व्यक्तिमत्त्वांचा आदर करतो,’ असे म्हणत काँग्रेस पक्षाने शमा मोहम्मद यांनी सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट काढून टाकण्यात आली. पण यावेळी त्यांनी केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर तसेच भारतीय राजकारणात अनेकांनी काँग्रेसवर तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

भाजपचा हल्लाबोल

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी केलेल्या या टीकेनंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेस प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत टीका केली की, “काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. आता ते भारतीय क्रिकेट कर्णधाराच्या मागे लागले आहेत. भारतीय राजकारणात अपयशी ठरल्यानंतर राहुल गांधी आता क्रिकेट खेळतील अशी त्यांची अपेक्षा आहे का?” असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलेले हे विधान म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक देशभक्ताचा अपमान आहे, मी काँग्रेसच्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

तसेच, भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. “राहुल गांधींच्या नेतृत्वात 90 निवडणुका हरलेले लोक रोहित शर्माच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित करत आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्ली निवडणुकीत तब्बल सहा वेळा डक (शून्य) पाहायला मिळाला होता. तुमच्या डकची म्हणजेच तुमच्या कर्णधाराची काळजी घ्या.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.