घरदेश-विदेशईडीचे छापे हे सूडाच्या राजकारणाचे उदाहरण; काँग्रेसची केंद्रावर आगपाखड

ईडीचे छापे हे सूडाच्या राजकारणाचे उदाहरण; काँग्रेसची केंद्रावर आगपाखड

Subscribe

छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ज्यानंतर काँग्रेसने ईडीचा केंद्राकडून गैरवापर होत असल्याने केंद्र सरकावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्यांचे कार्यालय असलेल्या ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यामुळे हे सूडाच्या राजकारणाचे उदाहरण असल्याचे म्हणत काँग्रेसकडून केंद्रावर टीका करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये ईडीकडून आज (ता. २० फेब्रुवारी) सकाळी ईडीकडून १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या घरावर देखील छापे मारण्यात आले आहेत. काँग्रेसचे ८५वे अधिवेशन लवकरच सुरु होणार आहे. पण त्याआधीच ईडीने छापे मारल्याने हे सूडाच्या राजकारणाचे उदाहरण असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून बोलले जात आहे. तर यावेळी काँग्रेसने गेल्या आठ वर्षात ईडीने किती छापे मारले, याबाबतची आकडेवारी सुद्धा सांगितली आहे.

येत्या काही दिवसात काँग्रेसचे महाधिवेशन होणार आहे. त्याआधीच ईडीकडून छत्तीसगडमधील काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील विरोधकांविरुद्धचे हत्यार बनले आहे. ईडी निःपक्षपणे काम करत नाही.

- Advertisement -

तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आव्हान करत म्हंटले आहे की, ईडीने गेल्या ९ वर्षात टाकलेल्या छाप्यांमध्ये ९५ टक्के विरोधी नेते आहेत आणि बहुतेक काँग्रेस नेत्यांच्या विरोधात आहेत. काँग्रेस नेत्यांवर छापे टाकणे हे भाजपचे भ्याडपणा दाखवून देते. तर भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजपची अस्वस्थता दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींमध्ये प्रामाणिकपणा असेल तर त्यांनी आपल्या जवळच्या मित्राच्या घरावर छापे टाकावेत.

याबाबत बोलताना काँग्रसचे पवन खेडा म्हणाले की, केवळ राजकीय पक्षांबद्दल बोलायचे तर ९५ टक्के छापे फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच पडले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि मल्लिकीर्जुन खरगे यांची चौकशी करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे अधिवेशन होणार असल्याने छत्तीसगडमध्ये छापे टाकण्या सुरुवात झाली आहे. आता ईडीचा अर्थ लोकशाही संपवणे असा झाला आहे, अशी टीकाही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीच ‘या’ नेत्यांच्या घरांवर ईडीची छापेमारी

महत्वाची बाब म्हणजे, २०१३४ पासून भाजपच्या विरोधात असलेल्या काँग्रेसवर २४ वेळा, राष्ट्रवादी काँग्रेसवर ११, टीएमसीवर १९ वेळा, शिवसेना ८, द्रमुकवर ६. आरजेडीवर ५, बसपावर ५ वेळा तर इतर काही पक्षांवर कमीत कमी दोन ते तीन वेळा छापा पडला असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -