घरराजकारणगुजरात निवडणूककाँग्रेसने व्होट बँकेसाठी दहशतवादाला पोसले; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

काँग्रेसने व्होट बँकेसाठी दहशतवादाला पोसले; पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

Subscribe

गुजरात दीर्घकाळापासून दहशतवादाचे लक्ष्य राहिला आहे. सुरत आणि अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात शेकडो लोक मारले गेले. तेव्हा काँग्रेस केंद्रातील सत्तेत होती. आम्ही त्यांना दहशतवादाला संपवण्यास सांगितले, पण त्यांनी मलाच लक्ष्य केले.

गुजरात दीर्घकाळापासून दहशतवादाचे लक्ष्य राहिला आहे. सुरत आणि अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात शेकडो लोक मारले गेले. तेव्हा काँग्रेस केंद्रातील सत्तेत होती. आम्ही त्यांना दहशतवादाला संपवण्यास सांगितले, पण त्यांनी मलाच लक्ष्य केले. जोपर्यंत व्होट बँकेचे राजकारण नाहीसे होत नाही तोपर्यंत दहशतवादाचे सावट कायम राहणार आहे. (Congress feeds terrorism for vote bank Prime Minister Modi serious accusation)

गुजरातमध्ये आम्ही दहशतवाद्यांना पकडले असताना तत्कालीन काँग्रेस सरकार व्होट बँकेच्या राजकारणासाठी दहशतवाद्यांना वाचवत होते. मी 14 वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या घटना आठवत होतो, मुंबईत जे घडले तो दहशतवादाचा कळस होता, पण आम्ही दहशतवादाविरोधात कडक पावलं उचलली, मात्र काँग्रेस नेते सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांची दहशतवादाला पोसण्याची विचारधारा अजून गेलेली नाही, अशा शब्दांत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातच्या खेडा मतदारसंघात एका प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भाजप सरकारने दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलवर कडक कारवाई केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली हे कोणीही विसरू शकत नाही. दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली तेव्हा काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ रडू लागले होते. आता काँग्रेस सोडून वेगवेगळे पक्ष पुढे आले असून ते शॉर्टकटचे राजकारण करत आहेत. गुजरात आणि देशाने अशा पक्षांपासून अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी आम आदमी पक्षावरही टीका केली.

जगातील श्रीमंत देशांच्या तुलनेत गुजरात कोणत्याही बाबतीत मागे राहू नये यासाठी ही निवडणूक आहे. तुमच्या आशीर्वादाने मी मोठा झालो, या मातीने मला मोठा केला, तुम्ही माझे गुरू आहात. आमच्या सरकारने महामारीच्या काळात मोफत अन्नधान्य दिले, योजनेवर 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. ब्रिटिशकालीन काँग्रेसने आदिवासींवर अन्याय केला होता. त्यांना बांबू लागवडीचे अधिकार दिले गेले नाहीत. भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर कायद्यात बदल केला, असेही पंतप्रधान म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -