घरताज्या घडामोडीVideo : काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात झेंड्याची दोरी ओढली अन्..., सोनिया गांधीही...

Video : काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात झेंड्याची दोरी ओढली अन्…, सोनिया गांधीही बघत राहिल्या

Subscribe

राष्ट्रीय काँग्रेसचा आज १३७ वा वर्धापन दिन आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात एक प्रकार घडला त्याने काँग्रेसचे हसे झाले परंतु ही घटनाच वाईट होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोरच ही घटना घडली आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात येत होता. परंतु झेंडा फडकवण्यासाठी दोरी खेचली आणि झेंडाच हातावर पडला. ही घटना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासमोरच घडली त्यासुद्धा हा सगळा प्रकार बघतच राहिल्या. असा प्रकार घडल्याने उपस्थित नेते सैरभेर झाले होते.

काँग्रेसचा वर्धापन दिन देशातील सर्वच राज्यात साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेस कार्यालयातही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात येणार होता. सोनिया गांधी आणि इतर नेते झेंडा फडकवण्यासाठी पुढे गेले आणि झेंड्याची दोरी ओढली. सुरुवातीला झेंडा वर गेला परंतु थोड्याच वेळात तो हातावर पडला. या प्रकारामुळे नेत्यांची तारांबळ उडाली होती. सोनिया गांधीही सगळा प्रकार पाहून अवाक झाल्या होत्या मात्र त्यांनी परिस्थिती लगेच सांभाळून घेतली. रितसर पुन्हा झेंडा फडकवण्यात आला. या घटनेमुळे काँग्रेसबाबत चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

लोकशाही आणि संविधान डावलून हुकूमशाही – सोनिया गांधी

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी सहभाग दाखवला नाही त्यांना त्याची किंमत समजू शकत नाही. अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, यातना सहन केल्या, तरुंगवास भोगला त्यानंतर कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. परंतु आता भारताचा मजबूत पाया कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासाला खोट ठरवण्यात येत आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक असुरक्षित आणि घाबरले आहे. लोकशाही आणि संविधान डावलून देशात हुकूमशाली सुरु आहे असा निशाणा सोनिया गांधींनी भाजपवर साधला आहे.


हेही वाचा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, अधिवेशनात मंत्र्यांसह आमदारांच्या संपर्कात आल्यामुळे चिंता

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -