घरताज्या घडामोडीमोदी सरकारच्या काळात झाला २३ पैकी १९ योजनांच्या नावात बदल

मोदी सरकारच्या काळात झाला २३ पैकी १९ योजनांच्या नावात बदल

Subscribe

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदल आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे मोदी सरकारने बदलले आहे. पण मोदी सरकारच्या काळात एखाद्या योजना किंवा पुरस्काराचे नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक वेळा योजनांची नावे बदलून नव्याने ठेवण्याचे प्रताप मोदी सरकारकडून झाले आहेत. युपीएच्या काळात कॉंग्रेसने ज्या योजना आणल्या त्यापैकी अनेक योजनांची नावे बदलणारे सरकार असाही आरोप मोदी सरकारवर याआधीही झाला होता. त्यामध्ये प्रामुख्याने २३ योजनांपैकी १९ योजनांची नावे बदलल्याचा आरोप हा कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी केला होता. त्यांनी मोदी सरकारचा उल्लेख हा नेम चेंजिंग गव्हर्नमेंट असाही केला होता. योजनांची नावा बदलण्याचे काम मोदी सरकारने केले आहे का ? याबाबतचा द क्विंट या पोर्टलने पडताळणीद्वारे शोध घेतला आहे. एकुण २३ योजनांच्या नावांची पडताळणी या निमित्ताने करण्यात आली आहे.

- Advertisement -

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अस करण्यासाठी देशभरातून नागरिक विनंती करत होते, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावे देणंच योग्य असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री जनधन योजना

कोणतीही किमान रक्कम गरजेची नसतानाच सामान्य बॅंक अकाऊंटमध्ये सर्व सुविधा देणारी ही योजना आहे. योजनेअंतर्गत एटीएम डेबिट कार्डही देण्यात येत होते. तसेच महिन्यापोटी चारवेळा पैसे काढण्याची मर्यादा योजनेअंतर्गत देण्यात आली आहे. सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठीच या Basci Saving Bank Deposit Account योजनेचा उद्देश होता. या योजनेचे नाव प्रधानमंत्री जन धन योजना असे करण्यात आले.

बेटी बचाव, बेटी पढाओ योजना

कॉंग्रेसच्या युपीए सरकारच्या काळात २४ जानेवारी हा दिवस National Girl Day म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर मात्र भाजपच्या मोदी सरकारच्या काळात ही योजना बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना म्हणून लॉंच करण्यात आली. महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंतर्गत ही योजना जाहीर करण्यात आली. सर्व शिक्षा अभियान यासारख्या योजना नव्याने लॉंच करण्याचा हा एक प्रयत्न होता.

स्वच्छ भारत अभियान

निर्मल भारत अभियान योजना ही सप्टेंबर २०१४ मध्ये एनडीए सरकारने स्वच्छ भारत अभियान म्हणून लॉंच करण्यात येत असल्याचे मोदी सरकारमार्फत जाहीर करण्यात आले. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने १९८६ ते १९९९ या कालावधीत सरकारकडून या योजनेला सेंट्रल रूरल सॅनिटेशन प्रोग्राम हे नाव देण्यात आले होते.

सरदार पटेल नॅशनल अर्बन हाऊसिंग मिशन

मोदी सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये राजीव आवास योजनेचे नाव बदलत सरदार पटेल नॅशनल अर्बन हाऊसिंग मिशन ठेवले. त्यामध्ये शहरी भागातील नागरी योजनांना प्राधान्य देण्यात आले. या नावाला बिजु जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी विरोध केला होता. केवळ योजनांचे नाव बदलल्याने योजनेची अंमलबजावणी वेगाने होणार आहे का ? असा सवाल त्यांनी केला होता.

प्रधान मंत्री आवास योजना

संसदीय समितीने ३१ ऑगस्ट २०१६ मध्ये इंदिरा आवास योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना करत असल्याचा अहवाल दाखल केला.

आणखी कोणत्या योजनांची नावे कशी बदसलली ?

  • जुने नाव – राजीव ग्रामीण विद्युतीकरण योजना
    नवे नाव – दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना
  • जुने नाव – जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युवल मिशन
    नवे नाव – अटल मिशन फॉर रिजुवेनेशन एण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन
  • जुने नाव – एसेलेरेटेड इरिगेशन बेनेफिट प्रोग्राम
    नवे नाव – प्रधान मंत्री कृषी सिंचयी योजना
  • जुने नाव – कॉंग्रेस नीम कोटेड युरिया
    नवे नाव – बीजेपी नीम कोटेड युरिया
  • जुने नाव – नॅशनल प्रोजेक्ट ऑन मॅनेजमेंट ऑफ सॉईल एण्ड हेल्थ एण्ड फर्टिलिटी
    नवे नाव – सॉईल हेल्थ कार्ड स्किम
  • जुने नाव – राष्ट्रीय कृषी विकास योजना
    नवे नाव – परंपरागत कृषी विकास योजना
  • जुने नाव – स्वावलंबन योजना
    नवे नाव – अटल पेंशन योजना
  • जुने नाव – जन औषधी योजना
    नवे नाव – प्रधान मंत्री जन औषधी योजना
  • जुने नाव – नॅशनल मॅन्युफॅक्चरींग पॉलिसी
    नवे नाव – मेक इन इंडिया

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -