घरदेश-विदेशकाँग्रेसमध्ये रामाचाही तिरस्कार करणारे नेते, आचार्य प्रमोद कृष्णम यांचा घरचा अहेर

काँग्रेसमध्ये रामाचाही तिरस्कार करणारे नेते, आचार्य प्रमोद कृष्णम यांचा घरचा अहेर

Subscribe

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच चार राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू आहे. अशातच काँग्रेस पक्षामधील नाराजी समोर आली आहे. काँग्रेसमध्ये असे काही नेते आहेत, जे केवळ राम मंदिराचाच नव्हे तर, रामाचाही तिरस्कार करतात, असा धक्कादायक दावा पक्षाचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.

हेही वाचा – कोणीही यावं आणि टपली मारून जावं…, सुषमा अंधारेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हा दावा केला आहे. तथापि, त्यांनी याबाबत कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही. काँग्रेसमध्ये असे काही नेते आहेत जे केवळ राम मंदिराचाच नव्हे तर रामाचाही तिरस्कार करतात. या नेत्यांना ‘हिंदू’ शब्दाबद्दलही घृणा आहे. ते हिंदू धर्मगुरूंचा अपमान करू पाहतात. पक्षात कुणी हिंदू धर्मगुरू आहे हे त्यांना पटत नाही, असे सांगून आपल्याच पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

या मुलाखतीदरम्यान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उघडपणे कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु ते वारंवार ‘ते’ हा शब्द वापरत होते. याबाबत आचार्य यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला.

हेही वाचा – शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले – “त्यावर मला भाष्य करायचे नाही.”

कदाचित पक्षाला हिंदूंच्या पाठिंब्याची गरज नाही, असे त्यांनी निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये पक्षाचा प्रचार न करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. यासाठी पक्षावर नाराज आहे का? असे विचारल्यावर नाराजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगतानाच, कदाचित काँग्रेसला हिंदूंच्या पाठिंब्याची गरज नसावी, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीत हिंदू धर्मगुरूला स्टार प्रचारक बनवण्यामागे एक उद्देश असतो. पण कदाचित काँग्रेसला यामागील उद्दीष्टात काहीतरी कमतरता दिसत असावी. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -