घरदेश-विदेशमाझ्या आईला राजकारणात का खेचता - नरेंद्र मोदी

माझ्या आईला राजकारणात का खेचता – नरेंद्र मोदी

Subscribe

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची प्रसार सभा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनाही खडेबोल सुनावले.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची प्रसार सभा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनाही खडेबोल सुनावले. ‘माझ्याशी थेट भिडण्याची हिंमत नसल्यानं काँग्रेसचे नेते माझ्या आईला राजकारणात खेचत आहेत. जिला राजकारणातला ‘र’ही ठाऊक नाही, जी पूजा-पाठ करण्यात, देवाचं स्मरण करण्यात रमली आहे, तिचं नाव खराब का करता?’, असा सवाल करत त्यांनी काँग्रेसला जाब विचारला. शिवराज सिंह यांना शिव्या घालण्याआधी काँग्रेसनं बोफोर्स प्रकरणातील क्वात्रोची आणि अँडरसन ‘मामा’ला आठवावं, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

वाचा : मध्य प्रदेशच्या आमदाराला चपलेचा हार

- Advertisement -

असं का म्हणाले मोदी

इंदूरमध्ये गुरुवार, २२ नोव्हेंबर रोजी काँग्रेसची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी ‘अशुभ’ असल्याची टिप्पणी काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केली होती. मोदींच्या आईलाही राजकारणात खेचलं होतं. ‘डॉलरच्या तुलनेत रुपया इतका पडतोय की तो पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंह) वयाच्या जवळ पोहोचला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी करायचे. पण, आता तर रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय, असं विधान राज बब्बर यांनी केलं होतं. त्या विधानाला उत्तर देताना आजच्या सभेत मोदींना माझ्या आईला राजकारणात का खेचता, असा भावनिका प्रश्न विरोधकांना केला आहे.

वाचा : आज मध्य प्रदेशात राहुल गांधींचा मेगा रोड शो

- Advertisement -

वाचा : मध्य प्रदेशमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार; बापानेच मुलीला जाळले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -