घरदेश-विदेशकाँग्रेसने अपमान केला, त्या मोदींचा ऑटोग्राफ बायडेनना पाहिजे - अमित शाह

काँग्रेसने अपमान केला, त्या मोदींचा ऑटोग्राफ बायडेनना पाहिजे – अमित शाह

Subscribe

गांधीनगर : भाजपा (BJP) हा पहिला पक्ष आहे, ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रूपाने देशाला पहिला ओबीसी पंतप्रधान दिला. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता एवढी आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन (Joe Biden) त्यांचा ऑटोग्राफ मागतात. ते अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah) म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. रविवारी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मोदी समाजाच्या (Modi community) राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावली. या अधिवेशनाला पंतप्रधान मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी आणि सुरतचे भाजपा आमदार पूर्णेश मोदी आदी उपस्थित होते.

राहुल गांधी निशाण्यावर

- Advertisement -

मोदी समाजाच्या अधिवेशनाला संबोधित करताना अमित शाह यांनी सांगितले की, काँग्रेसच्या राजवटीत ओबीसींना अडचणींचा सामना करावा लागला. भाजपाचे पंतप्रधान मोदी यांनी या समाजाचा सन्मान केला. ते स्वत: गरीब कुटुंबातून आलेले असल्याने त्यांनी गरिबांचे दुःख जाणले. पंतप्रधान मोदी तुमच्या समाजाचे आहेत, याचा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

जर कोणी एखाद्या व्यक्तीचा अपमान करत असेल तर ती मोठी गोष्ट नाही, पण तीच व्यक्ती संपूर्ण समाजाचा अपमान करत असेल तर तो देशाचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेसने 56 वर्षे देशावर केवळ राज्य केले, याशिवाय ते काहीही करू शकले नाही. ओबीसी समाजाला कधीच सन्मान दिला नाही. काँग्रेसने नेहमीच या समाजाची उपेक्षा केली, त्यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला. मात्र सत्तेत येताच भाजपाने संपूर्ण समाजाला योग्य तो मान दिला. आमच्या पक्षानेच अवघ्या नऊ वर्षांत खूप काही केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला पहिला ओबीसी पंतप्रधान दिला. भाजपाने अनेक ओबीसी मुख्यमंत्री दिले आहेत. भाजपानेच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, असे शाह म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -