Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशCongress on Sam Pitroda : सॅम पित्रोदांच्या विचाराशी काँग्रेस सहमत नाही, जयराम रमेश यांनी केले स्पष्ट

Congress on Sam Pitroda : सॅम पित्रोदांच्या विचाराशी काँग्रेस सहमत नाही, जयराम रमेश यांनी केले स्पष्ट

Subscribe

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी चीनबाबत केलेल्या विधानामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. परंतु, त्यांच्या या विधानाशी काँग्रेस सहमत नसल्याचे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

नवी दिल्ली : चीनने केलेली फसवणूक काय आहे हे मला समजत नाही. त्यांच्याकडून आपल्याला काय धोका आहे, हे मला समजत नाही. त्यामुळे चीन आपला शत्रू आहे, असे मानणे थांबवावे लागेल. असे म्हणत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पित्रोदा यांच्या या विधानामुळे भाजपानेही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. परंतु, याबाबत आता काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. जयराम रमेश यांनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतची पोस्ट केली आहे. सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलेले विचार हे भारतीय काँग्रेसचे विचार नाही, असे जयराम रमेश यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. (Congress Jairam Ramesh clarification that party does not agree with Sam Pitroda statement about China)

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा हे कायमच त्यांच्या विधानामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात. पित्रोदा हे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती असल्याने यामुळे त्यांना सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. पण आता सॅम पित्रोदा यांनी चीनबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले आहे की, सॅम पित्रोदा यांनी चीनबद्दल व्यक्त केलेले अहवालित विचार निश्चितच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विचार नाहीत. आपल्या परराष्ट्र धोरणासमोर, बाह्य सुरक्षेसमोर आणि आर्थिक क्षेत्रासमोर चीन हा सर्वात मोठा आव्हान आहे. काँग्रेस पक्षाने मोदी सरकारच्या चीनबद्दलच्या दृष्टिकोनावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये 19 जून 2020 रोजी पंतप्रधानांनी चीनला सार्वजनिकरित्या दिलेली क्लीन चिट देखील समाविष्ट आहे. चीनबद्दल आमचे सर्वात अलीकडील विधान 28 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आले.

तसेच, संसदेला परिस्थितीवर चर्चा करण्याची आणि या आव्हानांवर प्रभावी उपाय शोधण्याचा सामूहिक संकल्प व्यक्त करण्याची संधी दिली जात नाही हे देखील अत्यंत दुर्दैवी आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्याकडून काही उत्तर देण्यात येते की नाही, याबाबतची चर्चा रंगली आहे. तर भाजपा सुद्धा काँग्रेसच्या भूमिकेवर काय मत व्यक्त करते की त्यांच्या या भूमिकेला लक्ष करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Sam Pitroda : चीनला आपला शत्रू मानणे थांबवा, काँग्रेस नेता सॅम पित्रोदा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?

चीनने केलेली फसवणूक काय आहे हे मला समजत नाही. त्यांच्याकडून आपल्याला काय धोका आहे, हे मला समजत नाही. मी म्हणतो की हा मुद्दा भरपूर पुराव्यांसह उपस्थित केला जात आहे. कारण शत्रूंना लक्ष्य करणे हा अमेरिकेचा स्वभाव आहे. त्यामुळे मला असे वाटते की, सर्व देशांनी एकत्र यावे आणि एकमेकांविरोधात संघर्ष करू नये. सुरुवातीपासूनच आमचा दृष्टिकोन संघर्षाचा राहिला आहे आणि या दृष्टिकोनामुळे शत्रू निर्माण होतात. त्या बदल्यात, देशातून पाठिंबा मिळतो. आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल आणि पहिल्या दिवसापासून चीन आपला शत्रू आहे असे मानणे थांबवावे लागेल. हे चुकीचे आहे आणि फक्त चीनमध्येच नाही, तर हे सर्वांमध्येच चुकीचे आहे, असे विधान काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते.