घरदेश-विदेशबीबीसीच्या पंतप्रधान मोदींसंदर्भातील 'त्या' वादग्रस्त व्हिडीओला काँग्रेस नेत्याचाही विरोध

बीबीसीच्या पंतप्रधान मोदींसंदर्भातील ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओला काँग्रेस नेत्याचाही विरोध

Subscribe

थिरुवनंतपुरम : बीबीसीने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक माहितीपट जारी केला आहे. हा माहितीपट भारताने युट्यूबने व्हिडीओ ब्लॉक केला असून यासंबंधीचे ट्वीटही ब्लॉक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विरोधक यावरून टीका करत असतानाच काँग्रेसच्या एका नेत्याने मात्र या माहितीपटाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टरच्या अशा विचारांपासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका आहे, असे या नेत्याने म्हटले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी या माहितीपटाला विरोध केला आहे. अनिल अँटोनी यांनी अलीकडेच काँग्रेसच्या राज्य युनिटचे डिजिटल कम्युनिकेशन हाताळले आहे. विशेष म्हणजे, 2002च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीची हा वादग्रस्त माहितीपट केरळमध्ये प्रदर्शित करणार असल्याची घोषणा राज्य काँग्रेसच्या विविध शाखांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल अँटोनी यांनी ही भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बीबीसीने या घटनेवर वादग्रस्त माहितीपट बनवल्याची माहिती आहे. अनिल अँटोनी यांनी याबाबत ट्वीट केले आहे. भाजपासोबत गंभीर मतभेद आहेत. मात्र तरीही, ब्रिटन प्रायोजित या ब्रॉडकास्टरचे तसेच जॅक स्ट्रॉ यांचे भारताबद्दल फार पूर्वीपासून पूर्वग्रह आहेत. अशा विचारांचे समर्थन करणारे  ते लोक चुकीचा पायंडा पाडत असून त्यामुळे भारतीय संस्थांना धोका आहे.’ जॅक स्ट्रॉ हे इराक युद्धामागील ‘ब्रेन’ मानले जातात. अशा विचारांमुळे आपले सार्वभौमत्व दुर्बळ होईल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

जिल्हा मुख्यालयात माहितीपट दाखवण्याची काँग्रेसची घोषणा
बीबीसीने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ नावाचा एक माहितीपट युट्यूबवर प्रसारित केला. याची दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबवर प्रसारित झालेला व्हिडिओ हटविला. तसेच या युट्यूबच्या लिंक ज्या ट्विटर खात्यांवरूनही शेअर करण्यात आल्या होत्या, ते ब्लॉक करण्याचेही निर्देश दिले.

देशात अघोषित बंदी लक्षात घेता, प्रजासत्ताक दिनी पक्षाच्या जिल्हा मुख्यालयात वादग्रस्त बीबीसी माहितीपट प्रदर्शित केला जाईल, असे केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या (KPCC) अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शिहाबुद्दीन करयात यांनी जाहीर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -