क्रूझ ड्रग्ज प्रकरण, खरं लक्ष्य ‘शाहरुख खान’- शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची तोफ धडाडली

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते आणि बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी क्रुझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरण जाणीवपूर्वक वाढवले जात असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मुद्रा एयरपोर्टवर मोठ्या प्रमाणात सापडलेल्या ड्रग्जसाठ्यावरून लोकांच लक्ष हटवण्यासाठीच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चिघळवलं जात असल्याचाही आरोप सिन्हा यांनी केला असून या प्रकरणामागचं खरं लक्ष शाहरुख खान असू शकतो असंही सिन्हा यांनी म्हटल आहे.

यामुळे सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबदद्ल अधिक बोलताना सिन्हा म्हणाले की आमच्या काळी किंवा अगदी काही वर्षांपर्यंत ड्रग्जशी संबंधित  गोष्टी कधीच कानावर आल्या नाहीत. दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद यांच्यावेळी असो किंवा अमिताभ बच्चन, जितेंद्र, आणि माझ्यावेळीही ड्रग्जशी संबंधित कधीच ऐकले व बोलले जात नव्हते.

पण मला वाटत की यामागे नक्कीच काहीतरी कटकारस्थान आहे. पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी यावर काही बोलू शकत नाही. पण आर्यनजवळ ड्रग्ज सापडलेच नाहीत. त्यातच एनसीपीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी जे काही आरोप केलेत ते नक्कीच विचार करण्यासारखेच आहेत. यातील सर्वच आरोप योग्य नसले तरी त्यात तथ्य मात्र आहे. यामुळे त्यांची तपासणी होणे गरजेचे असल्याचंही सिन्हा यांनी म्हटल आहे.