माजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले आयटम!

kamal nath controvercial statement on imrati devi calls item

राजकारणात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यात निवडणुकांचा माहौल असेल, तर मग राजकीय नेतेमंडळी टीका करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात. मात्र, कधीकधी ही टीका आक्षेपार्ह शब्दांमध्ये किंवा खालच्या पातळीवर जाऊन केली जाते आणि संबंधित व्यक्तीच टीकेच्या केंद्रस्थानी येते. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या बाबतीत घडला आहे. मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. डबरा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कमलनाथ हजर होते. मात्र, प्रचारादरम्यान त्यांनी अशी काही भाषा वापरली, की उपस्थित सगळ्यांनाच दाद द्यावी की नाही, असाच प्रश्न पडला. शेवटी कमलनाथ स्वत:च आपण केलेल्या विनोदावर हसू लागले.

imrati devi
इमरती देवी

ये क्या आयटम है!

मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांचा प्रचार सुरू होता. याच मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार इमरती देवी निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रचाराच्या भाषणात बोलताना कमलनाथ म्हणाले, ‘सुरेश राजेजी आमचे उमेदवार आहेत. सरळ साध्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाहीत. काय आहे त्यांचं नाव? मी तुम्हाला काय त्यांचं नाव सांगू. तुम्ही त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखता. ये क्या आयटम है’.

कमलनाथ यांच्या या शब्दांवर राजकीय वर्तुळातून आक्षेप घेतला जात आहे. भाजपनं कमलनाथ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील सोमवारी सकाळी १० ते १२ या दोन तासात मूक निषेध करण्याची घोषणा केली आहे. ‘कमलनाथ यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटायला हवी’, असं देखील शिवराजसिंह चौहान म्हणाले.