स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्याचे नाव सांगा; कमलनाथांचे मोदींना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या त्यांच्या पक्षातील एका तरी नेत्यांचे नाव सांगावे असे आव्हान कमलनाथ यांनी दिले आहे.

congress leader kamalnath

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदींच्या या टीकेला मध्यप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. कमलनाथ यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्याचे नाव सांगा

छिंदवाडा येथे एका सभे दरम्यान कमलनात यांनी असे म्हटले आहे की, आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी बोलायचे. मात्र आता कुठे पण जातात तिथे राहुल गांधी आणि राष्ट्रवादावर बोलतात. जेव्हा मोदी छिंदवाडा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ३० मिनिटं फक्त राहुल गांधी आणि राष्ट्रवादावर बोलले. नरेंद्र मोदी काँग्रेसला राष्ट्रवाद शिकवतात. पण ज्या काँग्रेसने इंग्रजांविरोधात लढा दिला, त्यांनाच मोदी राष्ट्रवादाचे धडे देतात का? असा सवाल कमलनाध यांनी मोदी सरकारला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या त्यांच्या पक्षातील एका तरी नेत्यांचे नाव सांगावे असे आव्हान कमलनाथ यांनी दिले आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मी शेतकऱ्याचा पुत्र असल्याचे सांगतात मात्र राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शेतकरी आत्महत्या करतात. मात्र परिस्थिती तशीच आहे जशी अफ्रिकेमध्ये आहे अशी टीका कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान यांच्यावर केली आहे. राज्य सरकार औद्योगिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – 

राहुल गांधींनी बैल तरी जुंपले आहेत का? – अमित शहा

राहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांच्यात ट्विटर युद्ध

हे भाजपाच्या परंपरेला साजेसचं – राहुल गांधी

चौकीदार ही चोर, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल