घरदेश-विदेश...तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन निवडणुका घ्या म्हणजे कोरोना जाईल - नाना...

…तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन निवडणुका घ्या म्हणजे कोरोना जाईल – नाना पटोले

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा केद्रीय गृहमंत्री अमित शहांना टोला

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्या निवडणूक असलेल्या राज्यांत कोरोनाचा धोका नाही या विधानाचा समाचार घेतला आहे. निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तर केंद्रातील सरकार बरखास्त करा आणि देशभरात निवडणुका लावा, असा टोला नाना पटोले यांनी अमित शहांना लगावला. अमित शहांनी जावई शोध लावू नये, असं देखीन नाना पटोले म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे बंगालमध्ये मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या जात आहेत. यावर बोलताना अमित शहा यांनी महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? तिथे ६० हजार केसेस आहेत तर इथे ४ हजार आहेत. महाराष्ट्रासाठी माझ्या हृदयात सहानभूती आहे आणि बंगालसाठी देखील आहे. याला निवडणुकीशी जोडणं योग्य नाही आहे. कारण जिथे निवडणुका नाही आहेत तिथे कोरोना वाढलाय. याला तुम्ही काय म्हणाल? असं अमित शहा म्हणाले. अमित शहांच्या वक्तव्याचा नाना पटोलेंनी चांगलाच समाचार घेतला.

- Advertisement -

निवडणुका जिथे आहेत, त्या राज्यांमध्ये कोरोना नाही, असं गृहमंत्री अमित शहा म्हणतात. मग केंद्रातलं सरकार बरखास्त करा आणि देशात निवडणुका घ्या. त्यानं संपूर्ण देशातला कोरोना नष्ट होईल असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून केंद्राने आपली जबाबदारी राज्य सरकारवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. पण राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये. वेळप्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे,अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना नाही अशी मुक्ताफळे उधळली आहेत. निवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर मग केंद्रातील सरकारही बरखास्त करून देशात निवडणुका लावाव्यात म्हणजे कोरोना नष्ट होईल, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत कोरोनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसीवर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देत होत्या त्यांनी आश्चर्यकारकरित्या आपली भूमिका बदलून ३१ मे पर्यंत आम्ही महाराष्ट्राला दररोज फक्त ५०० इंजेक्शनचा पुरवठा करू असे सांगितले. या कंपन्यांच्या बदललेल्या भूमिकेमागे केंद्र सरकारने त्यांच्यावर टाकलेला दबाव कारणीभूत आहे का? राज्याला रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी असा केंद्राचा प्रयत्न आहे का? असे सवाल पटोले यांनी केले.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -