घरताज्या घडामोडीViral Video : महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इराणींना कॉंग्रेस नेत्याने एअरपोर्टवर गाठले, म्हणाल्या...

Viral Video : महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इराणींना कॉंग्रेस नेत्याने एअरपोर्टवर गाठले, म्हणाल्या महागाईसाठी…

Subscribe

देशात दिवसागणिक महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या मुद्द्यावर एकाच विमानातून प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा यांच्यातील प्रश्नोत्तराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

काँग्रेस आणि भाजपमधील दोन्ही नेत्या या गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होत्या. परंतु विमानाने विमानतळावर थांबल्यानंतर आणि विमानातून उतरत असताना या दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण झालं. यामध्ये डिसोझा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना एलपीजीच्या वाढत्या किंमतीबद्दल प्रश्न विचारला. ज्यावर इराणी यांनी उत्तर दिले की, केंद्र सरकार विविध फायदेशीर योजनांद्वारे गरिबांना मदत करत आहे.

नेट्टा डिसोझा यांनी पेट्रोल आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारला असता, इराणी म्हणाल्या की तुम्ही लोकांचा रस्ता अडवत आहात, यावर डिसोझा म्हणाल्या की, महागाईची समस्या सर्वांनाच मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर उत्तर देताना इराणी म्हणाल्या की, सरकार जनतेला मोफत रेशनचे वाटप करत आहे. १.८३ अब्ज मोफत लसी देण्यात आल्या आहेत. या संभाषणाचा व्हिडिओ डिसोझांनी आपल्या ट्विटर अकाऊंटर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

डिसोझा यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लिहिले की, गुवाहाटीला जात असलेल्या मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी बातचीत केली. एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दराबाबत विचारले असता त्यांनी लसी, रेशन आणि गरिबांना जबाबदार ठरवलं आहे. या दोघांमध्ये चर्चा सुरू असताना, दोन्ही नेत्यांनी आपापल्या फोनवरून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.


हेही वाचा : Bank Holidays: १४ ते १७ एप्रिलपर्यंत या शहरांमध्ये बंद राहणार बँका, कधी ते जाणून घ्या?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -