Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. जुलैमध्ये योगा करत असताना पडले असता त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांच्यावर मंगळुरूमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ऑस्कर फर्नांडिस यांच्या जाण्याने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विश्वासू सहकारी गमावला. (Congress leader Oscar Fernandes passes away)

ऑस्कर फर्नांडिस जुलै महिन्यात योगा करताना पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना मंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यांच्यावर एक सर्जरीही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सोनिया गांधींचे विश्वासू नेते

- Advertisement -

सोनिया गांधींच्या विश्वासू नेत्यांपैकी ऑस्कर फर्नांडिस एक होते. फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री होते. त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्षही होते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ऑस्कर फर्नांडिस यांच्या जाण्याने माझं वैयक्तीक नुकसान झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहेत. ऑस्कर फर्नांडिस हे अनेकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात राहील, असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

तप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभा खासदार श्री ऑस्कर फर्नांडिसजी यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे. “राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिसजी यांच्या निधनामुळे दु:ख झालं आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासह आणि हितचिंतकांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं.

 

- Advertisement -