घरताज्या घडामोडीCorona Vaccination: कोरोना लसीच्या पुरवठ्याचे कॅग ऑडिट करा - पी. चिदंबरम

Corona Vaccination: कोरोना लसीच्या पुरवठ्याचे कॅग ऑडिट करा – पी. चिदंबरम

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव मंदावला असल्याचे चित्र दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून रिकव्हरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात आला असून आतापर्यंत २० कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण पार पडले आहे. पण यादरम्यान लसीबाबत नवीन चिंताजनक विधानं समोर येत आहेत. अलीकडेच भारत बायोटेक कंपनीने सांगितले की, लसीचा पुरवठा आणि उत्पादन प्रक्रिया जटिल आहे. यामुळे कोवॅक्सिनची कमतरता दिसून येत आहे. यावर काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी लस पुरवठ्याचे कॅग ऑडिट करण्याचा सल्ला दिला आहे.

पी. चिदंबरम यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ‘गहाळ लसीचा विषय दिवसेंदिवस खोल होत आहे. लसीच्या एका बँचच्या उत्पादनासाठी आवश्यक लीड टाईमच्याबाबत भारत बायोटेकच्या विधानामुळे संभ्रम वाढला आहे. क्षमता एक गोष्ट आहे आणि उत्पादन ही एक वेगळी गोष्ट आहे. आम्ही दोन घरगुती उत्पादकांकडून आतापर्यंत उत्पादित केलेली वास्तविक मात्राबाबत जाणून घेऊ इच्छित आहे. एकदा आम्ही वास्तविक उत्पादनबाबत जाणून घेऊ, तर आम्हाला सांगितले पाहिजे की, कोणत्या तारिख-वाराला काय दिले गेले आहे आणि कोणास दिले गेले आहे.’

- Advertisement -

पी.चिदंबरम पुढे म्हणाले की, ‘दोन घरगुती (स्वदेशी) उत्पादकांची क्षमता, उत्पादन, पाठविणे, पुरवठा आणि ग्राहकांची यादी सीएजीद्वारे संचालित पूर्ण-स्कोपचे ऑडिटचे निर्देश देणे योग्य ठरेल. लसीकरणाच्या कमतरतेमुळे लोकांचा राग रस्त्यावर येण्यापूर्वी पहिल्यांदा आपण गहाळ झालेल्या लसींचे रहस्य सोडवणे आवश्यक आहे.’ शिवाय पी. चिदंबरम यांनी रिलायन्स ग्रुप, एचसीएल आणि इतर कंपन्यांनी आपले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय, व्यापारी भागीदार इत्यादींना लस देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.


हेही वाचा – Fact Check: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून ४ लाखांची होणार मदत? नेमकं सत्य जाणून घ्या

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -