घरदेश-विदेशदलितांवर, गरीबांवर आणि लोकशाहीवर हल्ला हाच भाजपचा खरा चेहरा - प्रियंका गांधी

दलितांवर, गरीबांवर आणि लोकशाहीवर हल्ला हाच भाजपचा खरा चेहरा – प्रियंका गांधी

Subscribe

अन्यायाविरोधात काँग्रेस निकराने लढा देईल

मध्य प्रदेशमध्ये दलित शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीवरुन प्रियांका गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला हाच आहे भाजपाचा खरा चेहरा, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

“गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला, हीच पाजपची पद्धत, चेहरा आणि चरित्र आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस निकराने लढा देईल,” असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

- Advertisement -

मध्यप्रदेशातील गुना या ठिकाणी एका दलित शेतकरी कुटुंबावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यामुळे आता मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं सांगणाऱ्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेल्याचा व्हिडीओ प्रियंका गांधी यांनी पोस्ट केला आहे. भाजपाचा हा खरा चेहरा असल्याची टीका त्यांनी केली आहे.


हेही वाचा – पायलट-गेहलोत लढाई न्यायालयात; नोटीसविरोधात याचिका दाखल करणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -