घरताज्या घडामोडीDelta Plus Variant: डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले...

Delta Plus Variant: डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न

Subscribe

देशातील कोरोनाची व्हायरसची दुसरी लाट हळूहळू मंदावत आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेले दोन दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. पण असे असले तरीही दुसऱ्या बाजूला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारला काय विचारले प्रश्न?

डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला एकूण ३ प्रश्न विचारले आहेत. याची चाचणी आणि रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग का होत नाही आहे?, डेल्टा प्लसवर लस किती प्रभावी आहे आणि याची पूर्ण माहिती कधी मिळेल?, तिसऱ्या लाटे दरम्यान यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय प्लॅन आहे?, असे प्रश्न राहूल गांधींनी मोदी सरकारला विचारले आहेत.

- Advertisement -

२३ जूनला सरकारच्या सुत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात ४० डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते. यापैकी सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आहेत.

- Advertisement -

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ५१ हजार ६६७ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ३२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६४ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १ लाख ३४ हजार ४४५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Delta Plus Variant: डेल्टा व्हेरियंटने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळला ८५ देशांमध्ये – WHO


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -