Homeदेश-विदेशRahul Gandhi : हा तर राष्ट्रद्रोहच ! दुसऱ्या देशात असते तर एव्हाना...

Rahul Gandhi : हा तर राष्ट्रद्रोहच ! दुसऱ्या देशात असते तर एव्हाना अटक, काय म्हणाले राहुल गांधी

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे राम मंदिरावरील विधान म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका कॉंग्रेस नेता आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी केली आहे. राम मंदिराची उभारणी झाल्यानंतरच देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचे डॉ. भागवत मंगळवारी म्हणाले होते.

National News : नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे राम मंदिरावरील विधान म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका कॉंग्रेस नेता आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी केली आहे. राम मंदिराची उभारणी झाल्यानंतरच देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचे डॉ. भागवत मंगळवारी म्हणाले होते. त्यावर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कॉंग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

स्वातंत्र्याबद्दल काहीही बोलणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. हेच वक्तव्य जर मोहन भागवतांनी दुसऱ्या कोणत्या देशात केले असते तर त्यांना अटक झाली असती. प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी झाली तो दिवस ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरा व्हायला हवा. कारण, अनेक शतकांपासून शत्रूंचे आक्रमण सहन करणाऱ्या या देशाला त्या दिवशी खरे स्वातंत्र्य मिळाल्याचे विधान भागवत यांनी केले होते.

हेही वाचा – Puja Khedkar : पूजा खेडकरची अटक पुन्हा टळली, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

भागवत यांच्या याच विधानाचा समाचार घेताना राहुल गांधी म्हणाले की, भागवत यांचे हे वक्तव्य म्हणजे राजद्रोहच आहे. कारण, त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ आहे की, इंग्रजांविरोधातील लढाई, संविधान बेकायदेशीर आहे. हा स्वातंत्र्ययुद्ध लढलेल्यांचा अपमान आहे. यामुळेच त्यांच्या अशा विधानावरून बाहेरील देशात त्यांच्यावर कारवाई झाली असती, असे त्यांनी म्हटले आहे.

भागवत यांचे हे विधान म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. अशाप्रकारची बडबड ऐकणं आता बंद झाले पाहिजे, असेही त्याने सांगितले. ही दोन विचारधारांची लढाई आहे. आम्ही संविधानाच्या मार्गाने जाऊ इच्छितो तर दुसऱ्या बाजूला हे आहेत जे याच्या विरुद्ध विचार करतात. भाजपा आणि संघाच्या विचाराला रोखू शकेल असा कॉंग्रेसशिवाय कोणताही पक्ष सध्या नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील मोहन भागवतांवर टीका केली आहे. जर ते अशाचप्रकारची विधाने करत राहिले तर त्यांना देशभरात फिरणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Mahakumbh 2025 : पाकिस्तानही घेतोय महाकुंभमेळ्याची माहिती, नेमकं कारण काय?