देशाची संपत्ती मित्रांना फ्री फंडमध्ये विकताहेत, राहुल गांधींचा मोदींना टोला

Rahul Gandhi

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी ट्वि्ट करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाची संपत्ती फ्री फंडंमध्ये मित्रांना विकत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर केली.

अमृतमोत्सवाच्या जल्लोषात मग्न असणाऱ्या भाजप सरकारने देशात महागाई नाही, असे सभागृहात सांगितले. परंतु, त्यांना महागाई कशी दिसेल? कारण त्यांनी डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली असून देशाची संपत्ती फ्री फंडमध्ये मित्रांना विकत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्रावर केली.

राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना २०१९ पासून देशात किती टक्के महागाई वाढली आहे. यासंदर्भात आकडेवारीच जाहीर केली आहे. ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. २०१९ आणि २०२२ मध्ये पेट्रोल, डीझेल, एलपीजी, मीठ, सोयाबीन तेल, चाय आदी. प्रकारच्या वस्तूंची किंमत गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या महागाईवरून देशभरात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदलने केली जात आहेत. शिवाय काल लोकसभेत देखील विरोधकांकडून वाढत्या महागाईबाबात केंद्र सरकारला घेरण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी देखील राहुल गांधींनी २७ जुलै रोजी ट्विट केलं होतं. त्यावेळी सिलिंडरची किंमत १ हजार ५३ कशासाठी, दही-अन्नावर जीएसटी का? आणि राईच्या तेलाची किंमत २०० रूपये कशासाठी?, असा अनेक प्रश्न राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले होते.


हेही वाचा : राज्यात 1886 नवे कोरोना रुग्ण; 2106 रुग्ण कोरोनामुक्त