घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Subscribe

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) नुकताच 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी असून, या समितीच्या अहवालानुसार, भारतात रोज 450 लोक आत्महत्या करत आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) नुकताच 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी असून, या समितीच्या अहवालानुसार, भारतात रोज 450 लोक आत्महत्या करत आहेत. याशिवाय, ब्लूमबर्गच्या इंडेक्स नुसार उद्योगपती गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. दरम्यान, एनसीआरबीचा आणि ब्लूमबर्गच्या इंडेक्सच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (congress leader rahul gandhi criticize pm narendra modi)

रोजंदारीवर काम करणारे पाच भारतीय दर तासाला आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर तासाला 85 कोटींची भर पडत आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

“रोजंदारीवर काम करणारे पाच भारतीय दर तासाला आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या मित्राच्या संपत्तीत दर एका तासाला 85 कोटींची भर पडत आहे. पंतप्रधानांचे एकच काम, मित्रांना श्रीमंत करण्यासाठी सामान्य माणसांची लूट करणे. सुटा बुटातील मोदी सरकारचे त्यांच्या मित्रांसाठी अच्छे दिन आले आहेत. नवीन भारत, मित्रांचा नवीन इंडिया”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

एनसीआरबीरच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटना वाढत आहेत. 2021 मध्ये भारतात (India) तब्बल 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये ही संख्या 1,53,052 होती. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण 6.2 टक्क्यांनी वाढले आहे. देशात एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

- Advertisement -

याशिवाय, ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या नव्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्लाचे मालक एलॉन मस्क आणि अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या मागोमाग आहे. गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट यांनाही मागे टाकले आहे.


हेही वाचा – देशभरातील गुन्हेगारीत मोठी वाढ; एनसीआरबीकडून आकडेवारी जाहीर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -