घरदेश-विदेशदेशात ‘हम दो हमारे दो’ चे सरकार

देशात ‘हम दो हमारे दो’ चे सरकार

Subscribe

राहुल गांधींची लोकसभेत टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. केंद्रातील मोदी सरकार हे ‘हम दो हमारे दो’चे सरकार आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता केला. कृषी कायद्यावरूनही राहुल गांधींनी टीकास्त्र सोडले. फक्त चार लोक देश चालवत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना भाजप खासदारांनी एकच गदारोळ केला. लोकसभा अध्यक्षांनी अनेकवेळा सांगूनही खासदारांचा हा गदारोळ सुरूच होता. एकवेळ अशी आली, राहुल गांधी यांचा माईकही बंद केला. राहुल गांधी म्हणाले, अध्यक्षजी, आपने मेरा माईक बंद करोगे, तो मै बोलूंगा कैसे?

- Advertisement -

या गदारोळ राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. शेतकर्‍यांकडे जर दुर्लक्ष केले तर या देशात भूकबळी जातील, देशात रोजगार उपलब्ध होणार नाहीत, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल असे राहुल गांधी म्हणाले.

देशाला उद्ध्वस्त करण्याची सुरुवात नोटबंदीपासून सुरू झाली. ही काही नवी गोष्ट नाही. हा पहिलाच प्रयत्न नाही. हे काम पंतप्रधानांनी हम दो हमारे दो साठी नोटबंदीपासून सुरू केले. गरिबांचे पैसे घेऊन हम दो हमारे दोच्या खिशात टाकले. शेतकर्‍यांना बर्बाद केले, जीएसटी आणून व्यापार्‍यांना बर्बाद केले, त्यानंतर आता पुन्हा शेतकर्‍यांवर, व्यापार्‍यांवर आणि मजुरांवर हल्ला केला.

- Advertisement -

कोरोनाकाळात मजूर ओरडत होते, आम्हाला तिकीट द्या, पण या सरकारने ते दिले नाही. या सरकारने केवळ व्यापार्‍यांचे, उद्योगांचे भले केले. नोटबंदीनंतर दोन चार उद्योगपतींना मदत केली. मात्र आता शेतकर्‍यांचा कणाच मोडलाय, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, आता ते उभेच राहू शकत नाहीत.

हे शेतकर्‍यांचे आंदोलन नाही, हे देशाचे आंदोलन आहे. शेतकरी फक्त अंधारात प्रकाश दाखवत आहेत. संपूर्ण देश हम दो हमारे दो यांच्याविरोधात एकजूट झाला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

लिहून घ्या, तुम्ही म्हणत असाल, देशातील शेतकरी, मजूर, व्यापार्‍याला तुम्ही पैशांनी नमवू शकाल असे वाटत असेल, पण लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही, शेतकरी-मजूर तुम्हाला हटवेल, पण तो एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला कायदा मागे घ्यावाच लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -