काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. बेल्जियममध्ये राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल म्हणाले की, भारतात सरकारी कंपन्या बंद केल्या जात आहेत आणि काही खास लोकांना पंतप्रधानांकडून मदत केली जात आहे. त्यांनी पुन्हा एकदा लोकशाही धोक्यात असल्याची चर्चा करत देशात अल्पसंख्याकही सुरक्षित नसल्याचे सांगितले.( Congress leader Rahul Gandhi once again said abroad Indian democracy in danger He also commented on changing the name of the country )
बेल्जियममध्ये राहुल गांधी बेल्जियम दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बेल्जियममध्ये राहुल गांधी म्हणाले की, भारतातील वातावरण सतत बिघडवण्याचे काम केले जात आहे. देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत असून, सरकार काहीच करत नसल्याचे ते म्हणाले. यासोबत राहुल गांधी म्हणाले की, देशातील मोदी सरकार अदानींसारख्या काही खास लोकांसाठी काम करत आहे आणि त्यांना फायदा करून देत आहे.
बेल्जियममधील पत्रकार परिषदेदरम्यान, जेव्हा राहुल गांधींना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले की, देशाचं नाव बदलून भारत असे करण्यास समर्थन देतील का, तेव्हा ते म्हणाले की देशाला हवे तसे नाव देणे हे फक्त सरकारवर अवलंबून आहे. मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सरकार हे सर्व करत असल्याचे ते म्हणाले.
रशिया-युक्रेन मुद्द्यावर सरकारसोबत
राहुल गांधी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धावर सरकारच्या भुमिकेचं समर्थन केले आहे. भारताच्या सध्याच्या परिस्थितीशी संपूर्ण विरोधक सहमत असल्याचे राहुल म्हणाले. सरकार सध्या जे काही करत आहे त्यासोबत आम्ही आहोत, असे ते म्हणाले.
(हेही वाचा: खर्गेंना G-20 डिनरचे निमंत्रण न दिल्याने वाद : काँग्रेसचे नेते म्हणाले, ‘मोदी है तो मनु है…’ )
दरम्यान, नवी दिल्ली येथे 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या G-20 शिखर परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. G-20 सदस्यांच्या पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इटलीचे पंतप्रधान ज्योर्जिओ मेलोनी यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीसोबत नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेला आता फक्त एक दिवस बाकी आहे. आज म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी जी-20 गटातील बहुतांश दिग्गज नेते दिल्लीत पोहोचतील. त्यांच्या स्वागताची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे स्वागत जनरल व्ही के सिंग करणार आहेत. अश्विनी चौबे यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना घेण्यासाठी जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक पहिल्यांदाच भारतात आले आहेत. जागतिक नेत्यांना भारताचा इतिहास, भारत मंडपम या शिखर परिषदेच्या ठिकाणी लोकशाही परंपरेसह डिजिटलमध्ये भारतानं केलेली क्रांती दाखवली जाईल. यासाठी भारत मंडपमच्या स्वागत समारंभाजवळ प्रदर्शन लावण्यात आले आहे. यामध्ये AI सारखे हाय एंड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.