घरदेश-विदेशकाँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, भाजपा आणि आरएसएस माझे गुरू... त्यांना धन्यवाद!

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, भाजपा आणि आरएसएस माझे गुरू… त्यांना धन्यवाद!

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे कायमच भाजपाच्या निशाण्यावर राहिले आहेत. आपली प्रतिमा बिघडविण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आरोप केला होता. तर आज, शनिवारी त्यांनी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) त्यांनी गुरू म्हणत त्यांचे आभार मानले.

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले, भाजपा- आरएसएस माझ्यासाठी गुरुसारखे आहेत. माझ्यावर टीकास्त्र करत असल्याबद्दल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला धन्यवाद देतो. कारण ते जितके जास्त टीका करतील, तितकी आपल्याला सुधारण्याची संधी मिळते. त्यांनी अधिक जोमाने टीकास्त्र करत राहावे, जेणेकरून काँग्रेस पक्ष आणि त्याची विचारधारा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल, असे मला वाटत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मी त्यांना माझा गुरू मानतो की, ते मला काय करावे आणि काय नाही, याचे मार्गदर्शन ते करत आहेत आणि चांगले प्रशिक्षण देत आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

- Advertisement -

विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांची आम्हाला साथ आहे हे मला माहीत आहे, असे सांगून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर भाजपने केलेल्या टीकेवर पलटवार केला. ते म्हणाले की, कन्याकुमारी ते दिल्ली या प्रवासात मी सरकारविरोधातील लोकांचा रोष पाहिला आहे. तथापि, भारताला जोडण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी भारत जोडो यात्रेचे दरवाजे खुले आहेत.

सुरक्षाव्यवस्थेवरून केंद्रावर टीका
माझी भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता मी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत बुलेटप्रूफ वाहनात जावे, अशी सरकारची इच्छा आहे. हे मला मान्य नाही. त्यांचे ज्येष्ठ नेते बुलेट प्रूफ गाडीतून बाहेर पडतात, त्यांना एकही पत्र येत नाही. काही जण खुल्या जीपमधून रोड शो करतात. हे त्यांच्याच प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे आणि तेच मला पत्र लिहितात! त्यांच्यासाठी प्रोटोकॉल वेगळा आहे आणि माझ्यासाठी वेगळा आहे का? मी बुलेटप्रूफ वाहनात कसा प्रवास करू? ते कदाचित अशी केस करत असतील की, राहुल गांधी आपली सुरक्षा तोडत आहे, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

मला थंडी वाजत नाही
एवढी थंडी असतानाही टी-शर्ट का घातला आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता राहुल गांधी गमतीने म्हणाले, तुम्ही स्वेटर घातला आहे, याचा अर्थ थंडी आहे असा होत नाही. याचा अर्थ तुम्हाला थंडीची भीती वाटते. मला थंडीची भीती वाटत नाही. मी टी-शर्ट घालण्याचे खरे कारण म्हणजे मला अजून थंडी वाजलेली नाही, हेच माझे टी-शर्ट घालण्याचे कारण आहे. जेव्हा थंडी आहे, असे वाटेल तेव्हा मी स्वेटर घालण्यास सुरुवात करेन, असे त्यांनी सांगितले.

शहीद कुटुंबीयांच्या वेदना समजू शकतो
मी शहीद कुटुंबातील आहे. माझे वडील शहीद झाले, माझी आजी शहीद झाली. त्यामुळे एक तरुण प्राणाचे मोल देतो तेव्हा काय होते, हे मला माहीत आहे. पण हे समजू शकेल असे भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वात कोणीही नाही. आमच्या सैन्यातील एक जवान सुद्धा शहीद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. सरकारने ही गोष्ट बेपर्वाईने घेऊ नये. लष्कराचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये आणि त्यात आमचे जवान व त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान होऊ नये, असे आम्हाला वाटत असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -