घरCORONA UPDATE'आर्थिक संकटात मनरेगाच आले धावून'; राहुल गांधी यांचा मोदी सरकारला टोला

‘आर्थिक संकटात मनरेगाच आले धावून’; राहुल गांधी यांचा मोदी सरकारला टोला

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनरेगा योजनेवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मनरेगा योजनेशी संबंधीत एक तक्ता ट्विटरवर शेअर केला असून मनरेगाशिवाय गरिबी नाही गरिब नष्ट होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी

राहुल गांधी यांनी वाढती बेरोजगारी आणि मनरेगा संदर्भातील एक फोटो ट्विट केला आहे. मनरेगा आणि घसरत चाललेल्या रोजगारांच्या आलेख शेअर केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदी म्हणाले होते, मनरेगामध्ये लोकांकडून फक्त खड्डे खोदून घेतले जातात. पण, सत्य हे आहे की, मोदीजींनी आर्थिक खड्डा खोदला असून, यातून गरिबांना बाहेर काढण्याचं काम मनरेगा आज करत आहे. मनरेगाशिवाय गरिबी नाही, तर गरीब संपेल.

- Advertisement -

कोरोनाच्या संकट काळात गरीब रूग्णांना मनरेगा ही योजना लाभदायक ठरत आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे देशात आर्थिक आघाडीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून, राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लॉकडाउनच्या निर्णयासह कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

भीमा कोरेगाव प्रकरणातील कार्यकर्ते वरवरा राव कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -