Coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह

Congress leader Rahul Gandhi tests positive for COVID19 with mild symptoms
Coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय स्तरावरचे अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून सौम्य लक्षणे असून कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. तसेच संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना काळजी घेण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. एकीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. तर दुसरीकडे देशभरात कोरोना संबंधित औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे नातेवाईक वणवण फिरताना दिसत आहेत. यादरम्यान महत्त्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे की, ‘सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा.’

कालच देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८८ वर्षीय मनमोहन सिंह यांनी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे म्हणजेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एम्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना ट्रोमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, सपा नेते अखिलेश यादव यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.


हेही वाचा – Maharashtra Lockdown: राज्यात बुधवारपासून सकाळी ७ ते ११ दरम्यान दुकानं सुरू राहणार