घरताज्या घडामोडीन्यू इंडिया आता चीनवर निर्भर, राहुल गांधींचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीवरुन केंद्रावर निशाणा

न्यू इंडिया आता चीनवर निर्भर, राहुल गांधींचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीवरुन केंद्रावर निशाणा

Subscribe

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी मेड इन चीन आहे. न्यू इंडिया चीनवर निर्भर असे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. न्यू इंडिया आता चीनवर निर्भर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. नुकतेच लोकार्पण झालेल्या संत रामानुजाचार्यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ११ व्या शतकातील वैष्णव संत श्री रामानुजाचार्यांच्या स्मरणार्थ २१६ फुट उंच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या पुतळा राष्ट्राला समर्पित केला आहे. रामानुजाचार्य यांनी राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात, पंथ याची पर्वा न करता प्रत्येक माणसाच्या भावनेने लोकांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले होते.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी मेड इन चीन आहे. न्यू इंडिया चीनवर निर्भर असे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

- Advertisement -

काही मीडिया रिपोर्टनुसार असा दावा करण्यात येत आहे की, श्री रामानुजाचार्य यांची भव्य मूर्ती चीनमध्ये तयार करण्यात आली आहे. चीनमधून १६०० पुतळ्याचे भाग भारतात आणले गेले आणि त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली. २०१५ मध्ये या मूर्तीसाठी टेंडर काढण्यात आले होते. यासाठी भारतातील काही कंपन्यांनीसुद्धा नोंदणी केली होती. परंतु याचा करार चीनच्या कंपन्यांसोबत करण्यात आला होता. यासाठी १३५ करोड रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी जगाला भव्य मोठा पुतळा समर्पित केला होता. ज्यांनी श्रद्धा, जात आणि पंथ यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समानतेचा पुरस्कार केला होता. ‘पंचलोहा’ ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पाच धातूंच्या मिश्रणाने बनवण्यात आली आहे. जगातील सर्वात उंच धातूच्या शिल्पांपैकी एक आहे. ही मूर्ती ५४ फूट उंचीच्या पायाभूत इमारतीवर ठेवण्यात आली असून तिला ‘भद्रावेदी’ असे नाव देण्यात आले आहे. वैदिक डिजिटल लायब्ररी आणि संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय ग्रंथ, एक थिएटर, एक शैक्षणिक गॅलरी असे मजले आहेत, ज्यात रामानुजाचार्य यांच्या अनेक कार्यांचा तपशील आहे.


हेही वाचा : BJP SP manifesto UP election : शेतकऱ्यांना मोफत वीज, वर्षाला २ सिलेंडर मोफत, भाजप अन् सपाकडून ९ सारखीच आश्वासनं

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -