घरदेश-विदेशAssembly Election Result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांची पहिली...

Assembly Election Result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

राजस्थान, मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणाच्या निवडणूक निकालांचे खरे चित्र आता समोर येत आहेत. तीन राज्यात भाजपला बहुमत मिळणार आहे. तिन्ही राज्यात काँग्रेस पक्षाच्या दारूण पराभवानंतर राहूल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहूल गांधी म्हणाले की, निकालानंतर राहुल गांधी यांनी सर्वांचे आभार मानले. “मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. विचारधारेची लढाई सुरुच राहणार. मी तेलंगणातील जनतेचाही खूप आभारी आहे. प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू,” अशी प्रतिक्रिया राहुल यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल मी तेलंगणातील मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आम्हाला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मतदान केले, त्या सर्वांचेही आभार मानतो. हे निवडणूक निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत, पण आम्हाला खात्री आहे की, आम्ही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने परत येऊ. मी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार मानतो. या पराभवाने खचून न जाता ‘INDIA’ आघाडीतील पक्षांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करू,” अशी प्रतिक्रिया खर्गेंनी दिली.

- Advertisement -

तिन्ही राज्यात काँग्रेस पक्षाच्या  पराभवानंतर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे की, तेलंगणातील जनतेने इतिहास रचला असून काँग्रेस पक्षाच्या बाजूने जनादेश दिला आहे. हा तेलंगणातील जनतेचा विजय आहे. हा राज्यातील जनतेचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे.

तेलंगणातील जनतेचे मनापासून आभार. काँग्रेस पक्ष तेलंगणात शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या जनतेने काँग्रेस पक्षाला विरोधाची भूमिका सोपवली आहे. जनतेचा निर्णय डोक्यावर आहे.

जय हिंद!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -