घरदेश-विदेशकाँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी जाहीर करा, शशी थरूर यांची मागणी

काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी जाहीर करा, शशी थरूर यांची मागणी

Subscribe

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवरून प्रचंड घमासान सुरू आहे. काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही. दरम्यान, या पदासाठी काँग्रेसने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी प्रकाशित करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharur) आणि आसामचे खासदार प्रद्युत बोरदोलोई (Pradyut Bordolai) यांनी केली आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणीक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistri) यांना या दोघांनी पत्र लिहून मतदारयादीची मागणी केली आहे.

हेही वाचा – काँग्रेस संपण्याच्या मार्गावर, प्रादेशिक पक्षही टिकणार नाहीत; भाजपा नेत्याचं वक्तव्य

- Advertisement -

काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यावरून वाद सुरू आहेत. राहुल गांधी यांनी पुढील अध्यक्ष व्हावं अशी मागणी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी केली आहे. मात्र, राहुल गांधी इच्छूक नसल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे पुढचा अध्यक्ष गांधी कुटुंबाच्या बाहेरचा होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेसने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार, मतदारयादी जाहीर करण्याची मागणी शशी थरूर आणि प्रद्युत बोरदोलोई यांनी केलीय.

हेही वाचा – शिवसेनेसारखी बंडखोरी काँग्रेसमध्येही होणार? गुलाम नबी आझाद यांचा मास्टरप्लान

- Advertisement -

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेत १० सूचकांचा समावेश करण्यात आलाय. काँग्रेस समितीचे प्रतिनिधीच सूचक असतील. त्यामुळे त्यांची नावे समजणे आवश्यक असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. त्यांचं नाव अंतिम यादीत न आल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो, असं थरूर यांनी म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -