Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश काँग्रेसच्या 'या' नेत्याने केले G-20 परिषदेचे कौतुक, भाजप नेते रवीशंकर म्हणतात...

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केले G-20 परिषदेचे कौतुक, भाजप नेते रवीशंकर म्हणतात…

Subscribe

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये दोन दिवसीय G-20 शीखर परिषद पार पडली. या परिषदेमध्ये 45 पेक्षा अधिक देशांचे प्रमुख उपस्थित राहिले होते. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देखील या परिषदेचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली : भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये दोन दिवसीय G-20 शीखर परिषद पार पडली. या परिषदेमध्ये 45 पेक्षा अधिक देशांचे प्रमुख उपस्थित राहिले होते. त्यानंतर या बैठकीमध्ये आफ्रिकन युनियनला देखील जी-20 मध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे कौतुक सर्वांकडूनच करण्यात येत आहे. भारताकडून करण्यात आलेल्या आदरातिथ्यामुळे परदेशी पाहुणे भारावून गेले आहेत. तर भारताच्या विरोधी पक्षांकडून देखील याबाबत वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत आहेत. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी देखील या परिषदेचे कौतुक केले आहे. ही परिषद म्हणजे भारताचा राजनैतिक विजय असल्याचे थरूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Congress leader Shashi Tharur praises G-20 conference, BJP leader Ravi Shankar says)

हेही वाचा – यंदाही दिल्लीत फटाके विक्री अन् फोडण्यावर बंदी; दिल्ली सरकारचा निर्णय, काय आहे कारण?

- Advertisement -

शशी थरूर यांनी केलेल्या विधानानंतर भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, “ही चांगली गोष्ट आहे. ते मुत्सद्दी नेते राहिले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने ज्या प्रकारे सन्माननीय स्थान प्राप्त केले आहे आणि ज्या प्रकारे आफ्रिकन युनियनला G20 मध्ये स्थान मिळाले आहे, तो भारतासाठी एक महत्त्वाचा राजनैतिक विजय आहे.”

तसेच, पंतप्रधानांनी एक ऐतिहासिक गोष्ट केली आहे. जर शशी थरूर यांना त्यात काही चांगले दिसले असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मला आशा आहे की काँग्रेसचे बाकीचे नेते, जे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांना देखील या जी-20 परिषदेमध्ये काहीतरी चांगले पाहायला मिळेल, असे रवीशंकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

शशी थरूर यांनी त्यांच्या X (ट्वीटर) या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी G-20 चे कौतुक करताना सांगितले की, देशात जे अपेक्षित नव्हते ते घडले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, नवी दिल्ली बाबतचा जाहीरनामा ही देशासाठी एक उपलब्धी आहे, कारण परिषदेपूर्वी कोणीही या जाहीरनाम्याची अपेक्षा केली नव्हती.

गेल्या अनेक दिवसांपासून या जी-20 शीखर परिषदेची चर्चा करण्यात येत होती. ज्यामुळे या परिषदेकडे सर्वांचेच लक्ष होते. या बैठकीमध्ये 45 पेक्षा अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिले होते. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या 15 द्विपक्षीय बैठका पार पडल्या. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वसहमतीचे दिल्ली घोषणापत्र, भारत- अमेरिका- सौदी अरेबिया दरम्यान महत्वाचे करार अशा अनेक कारणांमुळे भारतात झालेली जी 20 शिखर परिषद महत्वाची ठरली.

- Advertisment -