Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सध्या सोनिया गांधींची प्रकृती स्थिर आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाच्या लक्षण दिसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना सौम्य तापाची लक्षणे आढळल्याने दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी देखील सोनिया गांधीना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा एका दिवसांनंतर मेडिकल बुलेटिन जारी केल्यानंतर सोनिया गांधी निरोगी असल्याचे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीला सोनिया गांधी उपस्थित राहिल्या होत्या. यापूर्वी इंडियाच्या बंगळुरू बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

- Advertisment -