Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट झालं नसल्याने सेंट्रल व्हिस्टावर केलं, काँग्रेसचा मोदींना टोला

व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट झालं नसल्याने सेंट्रल व्हिस्टावर केलं, काँग्रेसचा मोदींना टोला

Subscribe

साहेबांची दुनियाच न्यारी असे खोचक ट्विट काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आहे. अमेरिका दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी यूएनजीसीमध्ये संबोधित केले यावेळी मोदींनी देशातील विकासकामांची माहिती दिली जगाला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिका दौऱ्यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट करण्यास मिळालं नाही म्हणून मोदींनी अचानक रात्री काम सुरु असताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाला भेट देऊन फोटोशूट केलं. साहेबांची दुनियाच न्यारी अशी खोचक टीका काग्रेसकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही पुर्वसूचना न देता रात्रीच्या सुमारास सेंट्रल व्हिस्टाला भेट दिल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेंट्रल व्हिस्टाच्या कामाची पाहणी करुन मोदींनी बांधकाम कामगारांशी संवाद साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोटोशूटची हौस अमेरिकेत पुर्ण न झाल्यामुळे त्यांनी सेंट्रल व्हिस्टामध्ये फोटोशूट केलं असल्याची खोचक टीका काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही यांनी केली आहे. काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी ट्विट करत मोदींच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत झाले नाही, यामुळे मोदींनी दिल्लीत आपलं स्वागत करुन घेतलं. व्हाईट हाऊसमध्ये मोदींना फोटोशूट करता आलं नाही यामुळे त्यांनी सेट्रल व्हिस्टाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन फोटोशूट केलं. साहेबांची दुनियाच न्यारी असे खोचक ट्विट काँग्रेस नेते श्रीनिवास बी.व्ही यांनी केलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड समितिच्या निमित्त अमेरिका दौऱ्यावर होते. मोदी अमेरिका दौऱ्यावरुन आल्यावर दिल्लीतील नव्या संसदेच्या प्रकल्पाला भेट दिली. मोदी रात्री ८ वाजून ४५ वाजताच्या सुमारास सेंट्रल व्हिस्टाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. कोणतीही माहिती न देता मोदी बांधकामस्थळी दाखल झाले. तासभर बांधकामाचा आढावा घेतल्यानंतर अधिकारी आणि कामगारांशी संवाद साधून आढावा घेतला. बांधकाम स्थळी जाताना मोदींनी सर्व नियमांचे पालन केले होते. परंतु मोदींच्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओवरुन काँग्रेसनं निशाणा साधला आहे.

वीस हजार कोटींचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प

- Advertisement -

दिल्लीत नव्या संसद भवनाची निर्मिती करण्यात येत असून हा प्रकल्प २० हजार कोटींचा आहे. या प्रकल्पामध्ये पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थान, नवे कार्यालय, इमारती आणि मंत्रालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय सचिवालय, नवीन संसद भवन आणि नवीन संकुल उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प एकूण २०,००० कोटी रुपयांचा आहे. या संसद भवनाचे बांधकाम २०२२ संसदीय अधिवेशनापर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा :  पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -