Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Karnataka Election Results : काँग्रेस 100हून अधिक जागांनी आघाडीवर; भाजपा पिछाडीवर

Karnataka Election Results : काँग्रेस 100हून अधिक जागांनी आघाडीवर; भाजपा पिछाडीवर

Subscribe

कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. कर्नाटकातील मुख्य लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्ये आहे. सध्याच्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसास काँग्रेस 112 जागांनी आघाडीवर आहे. तसेच, भाजपा 90 जागांनी पिछाडीवर आहे.

कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होत आहे. कर्नाटकातील मुख्य लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्ये आहे. सध्याच्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसास काँग्रेस 112 जागांनी आघाडीवर आहे. तसेच, भाजपा 90 जागांनी पिछाडीवर आहे. शिवाय, सिमाभागातील 6 जागांवर महाराष्ट्र एकिकरण समिती पिछाडीवर आहे. (Congress leading in 112 seats BJP trailing by 90 seats)

कर्नाटक निवडणुकीच्या मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस आघाडीवर असून, भाजपा पिछाडीवर आहे. कर्नाटकमधील निवडणुकीचे पहिले 183 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस 112 जागांनी आघाडीवर आले आहेत. तर भाजप 90 जागांवर तर जेडीएस 13 जागांवर आहे. कल सातत्याने बदलत आहेत.

- Advertisement -

आजचा दिवस काँग्रेस आणि भाजपसाठी खूप महत्वाचा असणार आहे. कर्नाटकच्या जनतेने कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकला ते स्पष्ट होत आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे.

शनिवारी दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता असून, बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी 2 वाजेपर्यंत जाहीर होणार आहेत.

- Advertisement -

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच केंद्रीय मंत्र्यांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनतेने कोणाची निवड केली हे दिसून येईल.

  • सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी यांनी आघाडीवर
  • सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, निखिल कत्ती आघाडीवर
  • भाजप 81, काँग्रेस 102, जेडीएसनं 15 जागांवर आघाडीवर

हेही वाचा – कर्नाटकातील सत्ताबदल काँग्रेससाठी संजीवनी ठरणार? राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

- Advertisment -