हे मुद्दे असू शकतात काँग्रेसच्या जाहिरनाम्यात

Former Congress President Rahul Gandhi
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

लोकसभा २०१९ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जाहिरनामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते हा जाहिरनामा प्रसिद्ध होणार आहे. काल, सोमवारी राहुल गांधी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, जर काँग्रेस सत्तेत आली तर १० महिन्यात २२ लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देतील. तसेच त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, नीति आयोग संपुष्टात आणण्याची तरतूद सोबतच ओबीसी वर्गासाठी आश्वासनं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध होणार आहे.

हे असू शकतात मुद्दे 

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजना ही अद्याप कागदावरच आहे. याच योजनेबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांनी असे म्हटले की, काँग्रेस पक्ष महापौरांची नियुक्ती करेल, जेणेकरून स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्याची मदत होईल. निवडून आलेला महापौरच शहराचा योग्य पद्धतीने विकास करू शकतो, असे राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले. यासंबंधी राहुल गांधी यांनी ट्विट करून माहिती दिली. या संबंधी काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्र समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनीही एएनआयला प्रतिक्रिया दिली असून, जेव्हा आम्ही सत्तेवर येऊ, तेव्हा सर्वात आधी राफेल व्यवहाराची चौकशी सुरू करू, असे म्हटले आहे.