घरदेश-विदेशपायलट यांनी दिली होती ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

पायलट यांनी दिली होती ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

Subscribe

राजस्थानातील राजकीय नाट्य उच्च न्यायालयात

राजस्थानमधील राजकीय नाट्य आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलं असून हा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच काँग्रेसच्या आमदाराने सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री असताना सचिन पायलट यांनी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह यांनी केला आहे.

राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाजारावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. घोडेबाजार प्रकरणी नोटीस पाठवल्यानंतर नाराज झालेले सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसविरोधात बंडाचं निशाण हाती घेतलं. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. पायलट यांना परत येण्यासाठी हाय कमांड संवाद साधत होता. परत येण्याचं आवहन करण्यात आलं. मात्र, कोणताही प्रतिसाद न दिल्यानं पक्षानं त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली. तर विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह समर्थक १८ आमदारांना सदस्यत्व रद्द करण्याच्या नोटीस पाठवण्यात आली. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात असून, काँग्रेसच्या आमदारांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

“मी कॉल रेकॉर्डिंग केलेली नाही. रेकॉर्डिंग करण्याबद्दल माहिती नाही. मी कधी खोटे आरोप लावत नाही. भाजपने माझ्यासोबत कधीही चर्चा केलेली नाही. विरोधी पक्षातील आहेत म्हणून खोटे आरोप लावणं चुकीचं आहे. माझी चर्चा सचिन पायलट यांच्याशी झाली होती. त्यांनी पैशाबद्दल चर्चा केली. जितके हवे तितके पैसे घ्या असं पायलट म्हणाले होते. ३५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. पायलट उपमुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना याबद्दलची माहिती दिली होती. सगळं काही ठिक होईल असं गेहलोत म्हणाले,” अशी माहिती आमदार गिरीराज सिंह यांनी दिली.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -