घरCORONA UPDATECorona: गुजरात मुख्यमंत्र्यांना भेटलेला 'तो' आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Corona: गुजरात मुख्यमंत्र्यांना भेटलेला ‘तो’ आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेऊन निघालेल्या काँग्रेसच्या आमदाराला नंतर कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेऊन निघालेल्या काँग्रेसच्या आमदाराला नंतर कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या काँग्रेसच्या आमदाराने काल सकाळी विजय रुपाणी यांची भेट घेतली होती. रुपाणी यांची दोन आमदारांसोबत ही बैठक झाली. त्यानंतर काही तासांनी म्हणजेच सायंकाळी तो काँग्रेसचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे आता मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासाठीही चिंता वाढली आहे. काही दिवसांपासून त्या आमदाराला ताप होता. त्याने चाचणीही करून घेतली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काही तासांची चाचणीचा अहवाल आला. त्यात त्याला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. आता या आमदारावर गांधीनगर येथील एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Lockdown Crisis: वांद्रे गर्दीनंतर सूरतमध्ये पुन्हा एकदा मजूरांचे आंदोलन

- Advertisement -

या आमदाराचा किती लोकांसोबत संपर्क आला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांचा शोध घेऊन त्यांनाही क्वारंटाइन करण्याची तयारी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडिओत हे स्पष्ट दिसून येते की, ते सगळे एकमेकांपासून किमान एक मीटर अंतरावर बसून बोलत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून आले आहे. सध्या गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ६१७ असून आतापर्यंत २६ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर ५५ जण या आजारातून बरे झाले आहेत.

दरम्यान, कालच मुंबईच्या वांद्रे स्थानकात दुपारी अचानक हजारो मजुरांनी गावी परतण्यासाठी गर्दी केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. त्यानंतर लगेचच सायंकाळी पुन्हा एकदा गुजरातच्या सूरतमध्येही शेकडो कामगारांनी गावी परतण्यासाठी आंदोलन केले. याआधी गेल्या आठवड्यात काही कामगारांनी हिंसक आंदोलन केले होते. सूरत शहरातील वरच्छा परिसरात शेकडो कामगार रस्त्यावर बसून धरणे आंदोलन करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -