घरताज्या घडामोडीपंतप्रधान गप्प का आहेत? चीनला आपल्या सैनिकांना मारण्याची हिंमत कशी झाली? -...

पंतप्रधान गप्प का आहेत? चीनला आपल्या सैनिकांना मारण्याची हिंमत कशी झाली? – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला आहे.

भारत-चीनमध्ये लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीत झाले आहेत. तसेच ४३ चिनींचा खात्मा केल्याचे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? काय लपवलं जात आहेत?, असा सवाल राहुल गांधी यांनी मोदींना केला आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? काय लपवलं जात आहेत? आता खूप झालं. नेमक काय घडलं हे आपल्याला कळायला हवं. चीनला आपल्या सैनिकांना मारण्याची हिंमत कशी केली? भारताचा भूभाग ताब्यात घेण्याची हिंमत चीनची कशी झाली?, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी ट्विट करून या हिंसक चकमकीत भारतीय अधिकारी आणि जवान शहीद झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला होता. त्यांनी म्हटलं होत की, ‘देशासाठी ज्या अधिकारी आणि जवानांनी आपले प्राण दिले त्याबद्दल जाणवत असलेली वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी त्यांच्यी प्रियजनांचं सांत्वन करतो. या कठीण प्रसंगात आम्ही तुमच्या सोबत आहोत.’

- Advertisement -

तसेच राहुल गांधी यांनी याआधी देखील भारत-चीन सीमेवरील तणावासंदर्भात ट्विट केलं होते. एक बातमी शेअर करत त्यांनी हे ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होत की, ‘लडाखमधील आपल्या क्षेत्रावर चीननं घुसखोरी करून ताबा मिळवला आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन धारणं करून बसले आहेत.’


हेही वाचा – Corona Update: देशात कोरोनामुळे एका दिवसात २००३ जणांचा बळी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -