Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन

२३ दिवस होते व्हेंटिलेटरवर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झालं. (Congress mp rajiv satav passed away )गेले काही दिवस ते कोरोनाविरुद्ध झुंज देत होते. २३ दिवस व्हेंटिलेटरवर होते. रविवारी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती. मात्र, शनिवारी त्यांची प्रकृती खालावली. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याचं काल समोर आलं. यावर त्यांच्यावर जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचं डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्याचबरोबर ते आता व्हेंटिलेटर शिवाय देखील श्वास घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना काही दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, असं डॉक्टरांनी म्हटलं होतं. मात्र, अखेर त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली.

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून कोरोनाची लक्षणं जाणवत होती. २२ तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर २३ एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. २८ तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

कोण होते राजीव सातव?

- Advertisement -

राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

- Advertisement -

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.


हेही वाचा – घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा

- Advertisement -