घरताज्या घडामोडीओमिक्रॉनपेक्षा ओ मित्रो जास्त धोकादायक, शशी थरूर यांची मोदी सरकारवर खोचक टीका

ओमिक्रॉनपेक्षा ओ मित्रो जास्त धोकादायक, शशी थरूर यांची मोदी सरकारवर खोचक टीका

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणाची सुरूवात ओ मित्रो या शब्दाने करतात. मात्र, त्यांच्या या शब्दावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ओमिक्रॉनपेक्षा ओ मित्रो हे जास्त धोकादायक असल्याची टीका शशी थरूर यांनी मोदी सरकारवर केली आहे.

ओमिक्रॉनपेक्षा ओ मित्रो जास्त धोकादायक

ओमिक्रॉनपेक्षा ओ मित्र हे जास्त धोकादायक आहे. ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला पाठींबा, संविधानावर कपटी मनाने केलेले हल्ले आणि लोकशाही कमकुवत होण्याचे परिणाम आपण रोज भोगत आहोत. या विषाणूचा कोणताही सौम्य प्रकार नाही. अशा प्रकारचं ट्विट शशी थरूर यांनी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केलंय. तसेच हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पेगासस प्रकरणावरून मोदींवर निशाणा

पेगाससच्या प्रकरणावरून शशी थरूर यांनी पीएम मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष पेगाससच्या मुद्द्यावर आक्रमक होत आहे. पीएम मोदींनी इस्त्राईलमधून पेगाससची विक्री केलीय, असा खुलासा न्यूयॉर्क टाईम्सने केलाय. जेव्हा मोदी इस्त्राईलमध्ये गेले होते. त्यावरून टाईम्सकडून खुलासा करण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजपावर हिंदू-मुस्लिमच्या मुद्द्यांवरून हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून शशी थरूर भाजपा आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. तेव्हा त्यांनी भाजपावर हिंदू-मुस्लिमच्या मुद्द्यांवरून हल्लाबोल केला होता.

दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं एक पत्र काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी ट्विट केलं होतं. त्याची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड होत आहे. नेताजींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात राजकीय नेते ऐकमेकांचा विचार कसा करायचे ते स्पष्ट होत आहे.


हेही वाचा : बाजीराव इथे तर माझी मस्तानी कुठंय, खासदार गिरीश बापटांच्या विधानाने पिकला हशा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -