घरक्रीडाInd vs NZ : 'पंतला आता विश्रांतीची गरज...'; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने...

Ind vs NZ : ‘पंतला आता विश्रांतीची गरज…’; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरुरांचा संताप

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज खेळवला जात आहे. मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करत आहे. एकिकडे सामना विजयासाठी भारतीय संघाचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे आजच्या संघ निवडीवरून भारतीय संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यातूनही यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज खेळवला जात आहे. मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करत आहे. एकिकडे सामना विजयासाठी भारतीय संघाचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे आजच्या संघ निवडीवरून भारतीय संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यातूनही यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. या मालिकेत संजू फक्त एकच सामना खेळू शकला. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी संजूला वगळल्याने भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Congress Mp Shashi Tharoor Tweet On Indian Cricketer Sanju Samson Dropped From Team In India Vs New Zeland Match)

खासदार शशी थरुर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. बुधवारी सकाळी त्यांनी ट्वीट करत भारतीय संघाच्या धोरणावर प्रश्चिन्ह उपस्थित केले. “पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली असून, त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे लक्ष्मणने म्हटले आहे. तो चांगला खेळाडू आहे. पण सध्या फॉर्ममध्ये नाही. मागील ११ पैकी १० सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. सॅमसनची वनडे सामन्यातील सरासरी ६६ इतकी आहे. गेल्या पाचही सामन्यात त्याने धावा केल्या असतानाही आता बाकावर बसला आहे. याबद्दल विचार करा”, असे शशी थरुर यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “पंतला आता विश्रांती देण्याची गरज आहे. संजूला आणखी एक संधी नाकारण्यात आली असून, आता त्याला आपण किती चांगले फलंदाज आहोत हे दाखवण्यासाठी आयपीएलची वाट पाहावी लागणार आहे”, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

संजू सॅमसनने आत्तापर्यंत ११ वनडे सामने खेळले असून १० डावांमध्ये ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. वनडे आणि टी-२० मध्ये ऋषभ पंतच्या तुलनेत संजूची कामगिरी चांगली असल्याने त्याला वगळण्यात आल्याने चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आम्हाला तुझा अभिमान…’, अर्जेंटिनाच्या महिलेने फडकावला भारताचा झेंडा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -