घरदेश-विदेशMallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बूथ कार्यकर्त्यांची कुत्र्यांशी...

Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बूथ कार्यकर्त्यांची कुत्र्यांशी केली तुलाना

Subscribe

काँग्रेसने शनिवारी दिल्लीतील रामलीला मैदानात न्यायसंकल्प रॅलीचं आयोजन केले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर टीका केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुला श्वानांशी केली आहे.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, बूथ एंजटची नियुक्ती करताना विचारपूर्वक करा. अचानक अनेकजण गायब होतात. आमच्याकडे असं म्हमातात की, जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा चांगला कुत्रा किंवा प्राणी खरेदी करायचा असेल तर बाजारात जाऊन योग्य चाचपणी करतात. इमानदार प्राणी हवा असेल तर त्याचा कान पकडून वर उचलतात. कान उचलल्यानंतर जर तो भुंकला तर ठीक, पण जर कुईकुई करत असेल तर कोणी घेत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही निवड करताना जो भुंकतोय, लढतोय, सोबत राहतोय त्याला घ्या. त्याला बूथचा एजंट बनवा, असं वक्तव्य मल्लिकार्जून खर्गे यांनी केलं.

- Advertisement -

कार्यकर्तांना संबोधित करत असताना मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सबका साथ, सबका विकासची घोषणा केली. पण त्यांनी फक्त सत्यानाश केला आहे. असं खर्गे म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, राहुल गांधी देशाचं संविधान वाचवण्यासाठी भाजपा सरकारमध्ये होणाऱ्या अत्याचारांविरोधात लढत आहेत. तुम्ही जर या लढाईमध्ये हारलात तर तुम्ही मोदींचे गुलाम व्हाल. देशात 30 लाख रोजगार आहेत. पण त्या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. नरेंद्र मोदी या देशातील जनतेला गुलामीत ढकलतील, असं खर्गे म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या टीका करत मल्लिकार्जून खर्ग म्हणाले की, नितीश कुमार पलटू राम, पलटू कुमार झाले असल्याचा टोला खर्गे यांनी लगावला. नरेंद्र मोदींनाही हीच सवय आहे. ते बोलत नाहीत, पण आतून सर्वांचा घात करत असतात. तोंडात राम आणि बगलेत सुरी घेऊन ते चालतात, असं वक्तव्य मल्लिकार्जून खर्गे यांनी केलं.

भाजपाचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानावर टीका केली आहे. “ज्या पक्षाचा अध्यक्ष आपल्या संघटनेच्या सर्वात मजबूत आणि महत्त्वपूर्ण दुवा ‘बूथ एजंट’ला ‘कुत्रा’ बनवून त्याची चाचणी करु इच्छितो त्या पक्षाची घसरण नक्की आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -