घरताज्या घडामोडीखोटी आश्वासने आणि जनतेची दुरवस्था, काँग्रेसचे भाजपाला 9 वर्षातील 9 प्रश्न; वाचा...

खोटी आश्वासने आणि जनतेची दुरवस्था, काँग्रेसचे भाजपाला 9 वर्षातील 9 प्रश्न; वाचा सविस्तर

Subscribe

केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन होऊन आता 9 वर्ष उलटली. मागील नऊ वर्षात केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेसाठी अनेक सोयीसुविधांच्या घोषणा केल्या. परंतु, यापैकी काही सुविधांच्या अश्वासनांची पुर्तता अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी सरकार निशाणा साधला आहे.

केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन होऊन आता 9 वर्ष उलटली. मागील नऊ वर्षात केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेसाठी अनेक सोयीसुविधांच्या घोषणा केल्या. परंतु, यापैकी काही सुविधांच्या अश्वासनांची पुर्तता अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी सरकार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या या 9 वर्षांवर एकुण 9 प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. (Congress Nine Question To Modi Government On Their 9 Years Pm Narendra Modi Rahul Gandhi)

काँग्रेसने ट्विटरवरून भाजपाला 9 प्रश्न विचारली आहेत. यावेळी “खोटी आश्वासने आणि जनतेच्या दुरवस्थेवर भाजपने 9 वर्षे जुनी इमारत बांधली. महागाई, द्वेष आणि बेरोजगारी – पंतप्रधान, तुमच्या अपयशाची जबाबदारी घ्या!”, असे लिहिण्यात आले. तसेच, “27 आणि 28 मे रोजी विविध शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करू. आम्ही मोदी सरकारला 9 प्रश्न विचारले आहेत, ज्यावर पंतप्रधान मोदी गप्प आहेत”, असेही लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

काँग्रेसने भाजपाला विचारलेली 9 वर्षांवरील 9 प्रश्न

अर्थव्यवस्था :

- Advertisement -
  • देशात महागाई आणि बेरोजगारी गगनाला भिडते का?
  • श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले आहेत?
  • सार्वजनिक मालमत्ता मोदींच्या मित्रांना का विकल्या जात आहेत?
  • आर्थिक विषमता का वाढत आहे?

शेती आणि शेतकरी :

  • गेल्या 9 वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाही?
  • काळे कृषी कायदे रद्द करताना शेतकरी संघटनांसोबत केलेले करार अद्याप का लागू केले नाहीत?
  • एमएसपीची हमी का दिली नाही?

भ्रष्टाचार/मैत्री :

  • अदानींच्या फायद्यासाठी एलआयसी आणि एसबीआयमध्ये लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा पणाला लावला का?
  • भ्रष्टाचार संपवण्याच्या गप्पा मारणारे पंतप्रधान अदानींच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी कुणाकडे आहेत याचे उत्तर का देत नाहीत?

चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा :

  • चीनला लाल डोळा दाखवण्याची भाषा करणार्‍या पंतप्रधानांनी 2020 मध्ये चीनला क्लीन चिट दिली, तरीही चीनने आमची भूमी काबीज केली आहे?

सामाजिक समरसता:

  • निवडणुकीतील फायद्यासाठी जाणीवपूर्वक फुटीरतावादी राजकारणाला खतपाणी घालून समाजात भीतीचे वातावरण का निर्माण केले जात आहे?

सामाजिक न्याय :

  • महिला, दलित, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचारावर पंतप्रधान गप्प का?
  • जात जनगणनेच्या मागणीकडे दुर्लक्ष का करत आहे?

लोकशाही संस्था :

  • विरोधी पक्ष आणि नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई का केली जात आहे?
  • जनतेने निवडून दिलेल्या विरोधी पक्षांची अनेक सरकारे का पाडली गेली?
  • गेल्या 9 वर्षात घटनात्मक आणि लोकशाही संस्था कमकुवत का झाल्या?

लोककल्याणकारी योजना:

  • अर्थसंकल्पात कपात करून मनरेगासारख्या लोककल्याणकारी योजना कमकुवत का झाल्या?
  • गरीब, आदिवासी, गरजूंच्या स्वप्नांचा चुराडा का होत आहे?

कोरोना गैरव्यवस्थापन:

  • कोरोनामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई का नाकारली गेली?
  • अचानक लॉकडाऊन करून लाखो कामगारांना घरी जाण्यास भाग पाडले गेले आणि त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह का सोडला गेला?

हेही वाचा – ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून अंबादास दानवेंची खोचक टीका, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -