घरदेश-विदेशCongress on BJP: 'EVM बनवणाऱ्या कंपनीत भाजपाचे चार नेते संचालकपदी; विरोधकांचा आरोप

Congress on BJP: ‘EVM बनवणाऱ्या कंपनीत भाजपाचे चार नेते संचालकपदी; विरोधकांचा आरोप

Subscribe

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीवर चार भाजप नेत्यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, असं म्हणत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली:विरोधकांनी नेहमीच EVM वरून भाजपावर आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा विरोधकांनी एव्हीएमवरून भाजपला घेरलं आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीवर चार भाजप नेत्यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, असं म्हणत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. (Congress on BJP Four BJP leaders as directors in EVM manufacturing company Accusations of opponents)

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भाजपचे अधिकारी ईव्हीएम उत्पादन कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये संचालक म्हणून काम करत असतील, तर EVM सुरक्षित कसं असेल?

- Advertisement -

रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत लिहिले की, हे असं करणं योग्य आहे का? ईव्हीएम सुरक्षित आणि विश्वासार्ह असेल का? असे प्रश्न काँग्रेस नेत्याने निवडणूक आयोगाला विचारले आहेत. तसंच या घटनेनंतरही निवडणूक आयोग गप्प का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं

सुरजेवाला यांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारचे माजी सचिव ईएएस सरमा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ईव्हीएम उत्पादन कंपनी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या संचालकपदावर भाजप नेते असल्याचं म्हटलं आहे. यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, तसंच अशा लोकांची पदे रद्द करण्याच्या सूचनाही त्यांनी मांडल्या आहेत. सरमा म्हणाले की, बीईएलने केलेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवावा.

- Advertisement -

विरोधी पक्षांचा आक्षेप

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनचे उत्पादन आणि वितरण करणारी कंपनी आहे. ही कंपनी ईव्हीएम मशीनमध्ये असणाऱ्या चिपसाठीचा गुप्त कोडही तयार करते. अशा कंपनीवर भाजपच्या चार नेत्यांनी नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीवर माजी केंद्रीय सचिव ईएएस सरमा तसंच विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

(हेही वाचा: Lalit Teckchandani Arrested : कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक टेकचंदानीला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -