Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाविरोधात दावे, मोठ्या गोष्टी करुन यश मिळणार नाही - पी. चिदंबर यांचा...

कोरोनाविरोधात दावे, मोठ्या गोष्टी करुन यश मिळणार नाही – पी. चिदंबर यांचा मोदींवर निशाणा

कोरोनाविरोधातील युद्धाचे काय झाले?

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संरर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. परंतु देशात लसीकरण करण्यासाठी लसींच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वच राज्यांतून कोरोना लसींची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्र सरकारद्वारे लस पुरवण्यात दुजाभाव केला जात आहे. कोरोना परिस्थितीवरून काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार लसीकरण मोहिमेला एकदा उत्सव म्हणत आहे तर दुसरीकडे दूसरे युद्ध म्हणत आहे. हे नक्की काय आहे? असा सवालही काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करताना २१ दिवसांत कोरोनाशी युद्ध जिंकण्याचा दावा केला होता त्या दाव्याचे काय झाले असाही सवाल पी. चिदंबरम यांनी केला आहे. पी. चिदंबरम यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद् मोदींवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला लॉकडाऊन घोषित केला त्या दिवशी २१ दिवसांत कोरोनाशी युद्ध जिंकण्याचा दावा केला होता. महाभारतात केवळ १८ दिवसात युद्ध जिंकले होते. परंतु कोरोनाविरोधातील युद्धाचे काय झाले? असा सवाल पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.

तसेच फक्त दावे आणि मोठ-मोठ्या घोषणा करुन कोरोनाविरोधात यश मिळवता येणार नाही. केंद्र सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणात लसींच्या पुरवठ्यामध्ये आणि वितरणामधील अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे.

- Advertisement -